
Manache Shlok Movie Controvercy: मराठी अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने दिग्दर्शित केलेला चित्रपट 'मना'चे श्लोक सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. 'मना'चे श्लोक या चित्रपटाच्या नावावरुन हिंदू संघटनांनी विरोध नोंदवत काही भागांमध्ये चित्रपटाचे शो बंद पाडलेत. पुण्यासह राज्यातील विविध भागात हिंदूत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आता चित्रपटाच्या टीमने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मात्र हा नेमका वाद काय आहे? चित्रपटाला का विरोध होत आहे? जाणून घ्या सविस्तर..
चित्रपटाला का विरोध होत आहे? Manache Shlok Controversy
अभिनेत्री मृण्मयी देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित 'मना'चे श्लोक या चित्रपटावरुन नवा वाद निर्माण झाला आहे. ‘मना'चे श्लोक हे चित्रपटाचे नाव धार्मिक भावना दुखावणारे आहे. मनाचे श्लोक हे रामदास स्वामींनी लिहलेले एक आध्यात्मिक पुस्तक आहे. या चित्रपटाची कथा लिव्ह इन रिलेशनशिपसारख्या वादग्रस्त विषयांवर आहे. त्यामुळे अशा कथेला 'मना'चे श्लोक नाव देण्यात येऊ नये, अशी हिंदूत्त्ववादी संघटनांची मागणी आहे. त्यामुळे चित्रपटाला जोरदार विरोध होत असून राज्यात अनेक भागात शो बंद पाडण्यात आले आहेत.
चित्रपटाची कथा नेमकी काय? What Is Story
'मना'चे श्लोक या चित्रपटामध्ये अभिनेत्री मृण्मयी देशपांडे, राहुल पेठे, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे इत्यादी कलाकार आहेत. मनाचे श्लोक हा एक कौटुंबिक चित्रपट आहे. चित्रपटात मुख्य नायक आणि नायिका म्हणजेच मनवा आणि श्लोक यांनी त्यांच्या मनांनुसार सुरु केलेल्या प्रवासाचे कथन आहे. ज्यावरुन या चित्रपटाचे नाव 'मना'चे श्लोक असे ठेवले. त्यामुळे या चित्रपटामध्ये कुठेही रामदास स्वामींचा किंवा त्यांच्या श्लोकाचा उल्लेख केला नाही. मात्र प्रदर्शनाच्या आधी अशाप्रकारे होत असलेला विरोध दुर्दैवी आहे. घटनांचा क्रम बघता हे सर्व पूर्वनियोजित आहे.
प्रदर्शन थांबवण्याचा निर्णय| Stopped Movie Show
दरम्यान, चित्रपटाला होत असलेला विरोध पाहता दिग्दर्शक, अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने एक मोठा निर्णय घेतला आहे. चित्रपटाच्या टीमने या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती त्यांनी सोशल मीडियावरुन दिली आहे. "नमस्कार ! 'मना'चे श्लोक या आमच्या चित्रपटाच्या प्रदर्शनावरून काल आणि आज पुणे, संभाजीनगर आणि पश्चिम महाराष्ट्रात ज्या घटना घडल्या त्या अतिशय दुःखद आहेत. हा संपूर्ण घटनाक्रम पाहता आम्ही या चित्रपटाचं प्रदर्शन संपूर्ण महाराष्ट्रात थांबवत आहोत आणि सिनेमाच्या नवीन नावासह येत्या गुरुवारी दिनांक 16 ऑक्टोबर 2025 रोजी पुन्हा एकदा हा चित्रपट प्रदर्शित करत आहोत. भेटूयात!' असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे. ".
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world