Manache Shlok: 'मनाचे श्लोक' चित्रपटाचे नाव अखेर बदलले, आता नव्या नावासह नव्या तारखेला होणार प्रदर्शित

हिंदू जनजागृती समितीने या नावाला विरोध दर्शवला होता.

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

मनाचे श्लोक हा मराठी चित्रपट त्याच्या नावा मुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित या चित्रपटा हिंदूत्ववादी संघटनांनी विरोध केला होता. पुण्यात या चित्रपटाला हिंदूत्ववादी संघटनांनी विरोध केला. हे नाव बदला नाही तर चित्रपट प्रदर्शित होवू देणार नाही असा इशारा देण्यात आला होता. या इशाऱ्यानंतर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. शिवाय चित्रपटाचे नावही बदलले जाईल अशी घोषणा ही करण्यात आली. त्यानुसार आता या चित्रपटाचे नाव बदलण्यात आले आहे. 

मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित ‘मनाचे श्लोक' या मराठी चित्रपटाचे शोज काही हिंदुत्ववादी संघटनांनी पुणे, छत्रपती संभाजीनगर , पश्चिम महाराष्ट्रात बंद पाडण्यात आले होते. यावेळी गोंधळही घालण्यात आला. त्यानंतर या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्यात आले. आधी हा चित्रपट 10 ऑक्टोबरला प्रदर्शित करण्यात आला होता. पण त्याचे प्रदर्शन थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यावेळी नवे नाव आणि प्रदर्शनाची नवी तारीख जाहीर करू असे सांगण्यात आले. त्यानुसार या चित्रपटाचे नवे नाव आता ‘तू बोल ना' असे असेल. शिवाय तो 16 ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.  

नक्की वाचा - Bollywood News: झिंगाट होवून सैराट! दारुच्या नशेत हॉटेलमध्ये सापडला बॉलिवूडचा मराठी स्टार

'मनाचे श्लोक'ला विरोध का होता?
‘मनाचे श्लोक' या चित्रपटाच्या नावाला विरोध का झाला याची चर्चा आता होत आहे. याच नावाने समर्थ रामदारांनी अध्यात्मिक पुस्तक लिहिलं आहे. त्यामुळे चित्रपटाला असं नाव देऊ नका अशी मागणी केली जात होती. त्याच बरोबर हा चित्रपटात लिव्ह-इन रिलेशनशिपसारखा मुद्द्या भोवती फिरणार आहे. त्यामुळे अशा आशयाच्या चित्रपटाला हे नाव असू नये अशी भावना हिंदूत्ववादी संघटनांची होती. त्यामुळे त्यांनी या चित्रपटाला विरोध करायला सुरूवात केली होती. हे नाव देऊन लोकांच्या भावना दुखावल्याची तक्रार केली जात होती. नेटकऱ्यांनीही या नावावरून टीका केली होती. 

नक्की वाचा - Shah Rukh Khan: फक्त या कोडने पाहू शकता ‘Ba***ds of Bollywood' चे ‘अनसीन' फुटेज, खुद्द शाहरुखनेच...

 हिंदू जनजागृती समितीने या नावाला विरोध दर्शवला होता. मनाचे श्लोक हे लोकांना धर्म, आत्म-शिस्त आणि भक्तीचा मार्ग दाखवत आले आहे असं समितीचे म्हणणे आहे. अशा मनाच्या श्लोकांना नफा आणि मनोरंजनाचं साधन बनवू नये असं समितीची भूमीका होती. यातून हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. असं त्यांनी सांगितलं होतं. शिवाय या चित्रपटाला आणि प्रदर्शनाला स्थगिती द्यावी, अशी मागणी सज्जनगड इथल्या ‘समर्थ सेवा मंडळा'ने केली होती. त्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात ही धाव घेतली होती. मात्र ही मागणी कोर्टाने अमान्य केली. यानंतर 10 ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित झाला. पण त्याचे शो बंद पाडण्यात आले.