2-2 रुपये देऊन 5 लाख शेतकऱ्यांनी बनवला हा चित्रपट, 48 वर्षांनी होणार विशेष गौरव

Cannes Film Festival : 77 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये एक खास हिंदी चित्रपट दाखवण्यात येणार आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
5
मुंबई:

77 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये एक खास हिंदी चित्रपट दाखवण्यात येणार आहे. हिंदी चित्रपटांच्या इतिहासात या सिनेमाचं खास स्थान आहे. कान्स फेस्टिव्हलमध्ये शुक्रवारी  Salle Bunuel मध्ये हा चित्रपट दाखवला जाईल. मंथन असं या खास चित्रपटाचं नाव आहे. श्याम बेनेगल यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात स्मिता पाटील यांची मुख्य भूमिका होती. कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील क्लासिक विभागात दाखवण्यासाठी निवडण्यात आलेला हा एकमेव भारतीय चित्रपट आहे. या चित्रपटात स्मिता पाटीलसह नसीरुद्दीन शाह, गिरीश कर्नाड, कुलभूषण खरंबदा, मोहन आगाशे, अनंत नाग आणि अमरीश पुरी यांची देखील भूमिका आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

शेतकरी झाले निर्माता 

श्याम बेनेगल यांचा हा चित्रपट वर्गीस कुरीयन यांच्या पुढाकारनं झालेल्या दुग्ध क्रांतीवर आधारित आहे. या चित्रपटाची विशेष बाब कोणत्याही बड्या प्रोडक्शन हाऊसनं हा चित्रपट बनवलेला ना्ही. तर पाच लाख शेतकरी याचे निर्माते होते. हे सर्व शेतकरी गुजरात कॉर्पोरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनशी संबंधित होते. गुजरातच्या पार्श्वभूमीवर बनवण्यात आलेला हा देशातील पहिला क्राऊडफंडिंग सिमेमा होता. त्यासाठी देशभरातील पाच लाख शेतकऱ्यांनी प्रत्येकी 2-2 रुपये दिले होते. स्वत: वर्गीस कुरीयन यांनी विजय तेंडुलकरांच्या मदतीनं या चित्रपटाची कथा लिहिली होती. 

( नक्की वाचा : सिनेमा किंवा डान्स नाही तर 'या' माध्यमातून होते सनी लियोनची कमाई, वाचा 115 कोटींच्या संपत्तीचं रहस्य )
 

1977 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. बेस्ट फिचर फिल्म आणि बेस्ट स्क्रीन प्ले गटातील पुरस्कार या चित्रपटाला मिळाले. भारताकडून ऑस्कर पुरस्कारासाठी हा चित्रपट पाठवण्यात आला होता. कान्समध्ये हा सिनेमा दाखवण्यात येणार असून त्यासाठी नसीरुद्दीन शाह आणि स्मिता पाटील यांचे कुटुंबीय देखील तिथं उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर चित्रपटाचे निर्माते आणि फिल्म हेरिटेज फाऊंडेशनचे शिवेंद्र सिंह देखील यावेळी हजर असतील.