Prathmesh Parab: 'दगडू'ची गाडी रुतली चिखलात! वसईची पोरं आली धावून, मात्र प्रथमेश VIDEO मुळे होतोय ट्रोल?

Marathi Actor Prathmesh Parab: अभिनेता प्रथमेश परबची कार वसईत चिखलात रुतली होती, जी स्थानिक मुलांनी धक्का मारून बाहेर काढली. या घटनेचा व्हिडिओ प्रथमेशने सोशल मीडियावर शेअर करत मुलांचे आभार मानले. मात्र लोक आता त्याला ट्रोल करत आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

महाराष्ट्रभरात सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. याच पावसाचा फटका आता 'टाइमपास' फेम मराठी अभिनेता प्रथमेश परब याला बसला आहे. वसई परिसरामध्ये शूटिंगसाठी जात असताना प्रथमेशची कार एका चिखलात वाईट पद्धतीने रुतली. स्थानिक तरुणांच्या मदतीने ही कार बाहेर काढण्यात यश आले खरे, मात्र या मदतीनंतर प्रथमेशने सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टवर नेटिझन्स त्याला ट्रोल करताना दिसत आहेत. 

अभिनेता प्रथमेश परब याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करत वसईतील या घटनेची माहिती दिली. प्रथमेशने आपल्या व्हिडीओत सांगितलं की, "वसईला शूटिंगसाठी जात असताना माझी कार चिखलात रुतली. बराच वेळ स्वतः प्रयत्न करूनही कार बाहेर निघत नव्हती. त्यानंतर वसईतल्या कामन गावातील काही स्थानिक मुलांनी आणि लोकांनी धावून येत मोठी मदत केली आणि कारला धक्का देऊन ती व्यवस्थित बाहेर काढून दिली. त्यांचे खूप खूप आभार!! बाहेर खूप पाऊस आहे, त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा. स्वतःची व आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्या."

Advertisement

पाहा VIDEO

(नक्की वाचा-  Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक ठप्प; रेल्वे वाहतूकही विस्कळीत)

"कंजूस निघाला दगडू..." ट्रोलिंगचा धडाका

प्रथमेशने मदतीचा व्हिडिओ शेअर करून स्थानिक तरुणांचे आभार मानले खरे, पण कमेंट बॉक्समध्ये नेटीझन्सनी त्याच्या 'फक्त थँक्यू' म्हणण्यावर तीव्र आक्षेप घेतला आणि त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

नेटिझन्सनी केले ट्रोल

"अरे भावा, नुसत्या थँक्यूने काय होतं? आम्ही तुझा सिनेमा बघायला गेलो आणि तिथे थँक्यू बोलून आलो तर चालेल का? त्या मुलांना नाश्त्याला कमीत कमी 500 ते 1000 रुपये द्यायला पाहिजे होते, तो आनंद वेगळा असता." दुसऱ्या एका युजरने कमेंट केली की, "त्या पोरांना चहा-पाण्यासाठी कमीत कमी 500-100 रुपये द्यायचे ना... एवढा मोठा हिरो आहेस तू." एका युजरने म्हटलं, "कंजूस निघाला दगडू! मुलांना थोडे पैसे देऊन खुश तरी करायला हवे होते."

Topics mentioned in this article