जाहिरात

Shri Krishna TV Series : श्रीकृष्ण मंदिरात मराठी अभिनेत्याला पाहण्यासाठी तोबा गर्दी, करावे लागले एअरलिफ्ट

या भूमिकेने स्वप्नील जोशीला देशभरात प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. श्री कृष्ण मालिकेतील भूमिकेनंतर मिळालेल्या अभूतपूर्व लोकप्रियतेचा खास किस्सा अभिनेत्याने एका मुलाखतीत सांगितला आहे. 

Shri Krishna TV Series : श्रीकृष्ण मंदिरात मराठी अभिनेत्याला पाहण्यासाठी तोबा गर्दी, करावे लागले एअरलिफ्ट
मुंबई:

Swapnil Joshi Shri Krishna TV Series :  स्वप्नील जोशी (Swapnil Joshi Marathi Actor) हा मराठी सिनेविश्वातील एक आघाडीचा, हरहुन्नरी अभिनेता म्हणून ओळखला जातो. मालिका, चित्रपटांमधून अनेक आव्हानात्मक भूमिका साकारत स्वप्नीलने मनोरंजन जगतात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी स्वप्नील जोशीने 'श्री कृष्ण' मालिकेतून (Swapnil Joshi Shri Krishna TV Serial) मनोरंजन जगतात पाऊल ठेवले. या भूमिकेने स्वप्नील जोशीला देशभरात प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. श्री कृष्ण मालिकेतील (Hindi TV Serial Shri Krishna) भूमिकेनंतर मिळालेल्या अभूतपूर्व लोकप्रियतेचा खास किस्सा अभिनेत्याने एका मुलाखतीत सांगितला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मराठी अभिनेता स्वप्नील जोशीने अनेक दमदार आणि आव्हानात्मक भूमिका साकारल्या. मात्र प्रेक्षकांच्या मनात कायमचे कोरलेले त्याचे पात्र म्हणजे श्रीकृष्णाची भूमिका. आज तीस वर्षानंतरही श्रीकृष्ण मालिकेतील भूमिकेमुळे स्वप्नील जोशीला अनेक जण ओळखतात. याच मालिकेतील अफाट लोकप्रियतेची प्रचिती देणारा एक किस्सा त्याने 'तिखट मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना सांगितला. ज्यामध्ये त्याने हरिद्वारमध्ये त्याला पाहण्यासाठी झालेली गर्दी आणि त्यानंतर उडालेला गोंधळ याचं वर्णन केलं आहे. 

काय म्हणाला स्वप्नील जोशी?

"मी  (अभिनेता स्वप्नील जोशी) आणि श्रीकृष्णा मालिकेचे निर्माते रामानंद सागर हे हरिद्वारमध्ये एका मंदिराच्या उद्घाटनासाठी गेलो होतो. मला श्रीकृष्ण म्हणून खास आमंत्रित करण्यात आले होते. आधी मी मुंबईहून दिल्लीला गेलो, तिथून डॉ. रामानंद सागर यांच्यासोबत चार्टेड हेलिकॉप्टरने हरिद्वारला निघालो. उद्घाटन करुन मी पुन्हा दिल्लीवरुन मुंबईला येणार होतो. तिथे गेल्यानंतर हेलिकॉप्टरसाठी तयार करण्यात आलेल्या हेलिपॅडवर प्रचंड गर्दी असल्याने लँडिगसाठी वाट पाहावी लागली, असं स्वप्नील जोशी म्हणाला. 

"तब्बल सव्वादोन तासानंतर आम्हाला लँडिग करू दिले. हेलिपॅडपासून मंदिराच्या उद्घाटस्थळी पोहोचायला अवघ्या पाच मिनिटाचे अंतर होते. मात्र प्रचंड गर्दीमुळे तिथे जायला तब्बल साडेसहा तास लागले. गर्दीमुळे मला परत यायला मार्गच नव्हता. सीआरएफची तुकडी मागवली, पोलिसांची अधिक कुमक मागवली, मात्र त्यांनीही आम्ही ही गर्दी नियंत्रित करू शकत नाही, असं सांगितलं. त्यानंतर मला तिथूनच डायरेक्ट एअरलिफ्ट केलं गेलं. हेलिकॉप्टर मंदिरावर होतं. त्याने मला उचललं आणि व्यवस्थित पुन्हा दिल्लीला गेलो, असा खास किस्सा अभिनेत्याने सांगितला.

अवघ्या 16 व्या वर्षी मिळालेलं हे प्रेम अफाट आणि अविश्वसनीय होतं,  यावेळी रामानंद सागर यांनी सांगितलेले शब्द मला आठवतात. ज्या वयात आम्ही मुलांवर संस्कार करतो, त्या वयात संपूर्ण देशावर संस्कार करत आहेस, याची काळजी घे..' अशा खास शब्दात त्यांनी कौतुक केल्याचेही अभिनेता स्वप्नील जोशीने सांगितले. तिखट मराठी या पेजवरुन शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com