Neha Pendse Photos: मराठमोळ्या अभिनेत्रीचा बोल्ड लुक, ऑफशोल्डर ट्रान्सपरंट ड्रेसमधील स्टायलिश फोटो पाहिले?

Neha Pendse News: मराठमोळ्या अभिनेत्रीचा बोल्ड लुक पाहिला का? फोटो पाहून चाहते घायाळ झाले...

जाहिरात
Read Time: 2 mins
"Neha Pendse Bold Photos : मराठमोळ्या अभिनेत्रीचा बोल्ड लुक व्हायरल"

Neha Pendse News: बदलत्या ट्रेंडनुसार मराठी सिनेसृष्टीमध्येही अभिनेता आणि अभिनेत्रींनी स्वतःच्या स्टाइलमध्ये आकर्षक बदल केले आहेत. कित्येक स्टार फॅशन-स्टाइलच्या बाबतीत बॉलिवूड कलाकारांनाही टक्कर देताना दिसत आहेत. मराठमोळ्या अभिनेत्रीही सोशल मीडियावर एकापेक्षा एक सुंदर आणि स्टायलिश बोल्ड लुकमधील फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असतात. नुकतेच एका मराठमोळ्या अभिनेत्रीने बोल्ड लुकमधील फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. तिच्या फोटोवर चाहत्यांकडून लाइक आणि कमेंट्सचा पाऊस पाडला जातोय. कोण आहे ती अभिनेत्री जाणून घेऊया...

ट्रान्सपरंट ड्रेसमधील अभिनेत्रीचे बोल्ड फोटोशूट

अभिनेत्री नेहा पेंडसेने (Neha Pendse) बोल्ड लुकमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. नेहाने पांढऱ्या रंगाचा ऑफ शोल्डर बॉडीकॉन ड्रेस परिधान केलाय. सी थ्रू पॅटर्न ड्रेसमुळे (See-Through Dress) नेहाचा लुक प्रचंड बोल्ड आणि स्टायलिश दिसतोय. 

Photo Credit: Neha Pendse Instagram

(नक्की वाचा: Gemini AI Saree Photos Trend: मराठमोळ्या अभिनेत्रींचे रेट्रो साडी लुकमधील 12 अप्रतिम फोटो पाहून म्हणाल:चांद तू नभातला...)

नेहाने नॅचरल लुक मेकअप केलाय. ड्रेसवर तिने केवळ इअररिंग्ज, रिंग्ज इतक्याच ज्वेलरी मॅच केल्या आहेत. नेहाच्या या पोस्टवर चाहत्यांनी फायर इमोजीचा पाऊस पाडलाय. यापूर्वीही नेहाच्या बोल्ड अवतारातील फोटोमुळे सोशल मीडियावर जाळ अन् धूर पसरल्याचे पाहायला मिळालंय.  

Photo Credit: Neha Pendse Instagram

(नक्की वाचा:  Priya Marathe News: शंतनूच्या नव्या मालिकेचा एपिसोड प्रियाने पाहिला, अन् दुसऱ्या दिवशी... सुबोध भावेने सांगितलं त्या रात्री नेमकं काय घडलं)

Advertisement

नेहा पेंडसेचा आणखी एक स्टायलिश लुक  

Photo Credit: Neha Pendse Instagram

(नक्की वाचा: Dashavatar Movie Box Office Collection: दिलीप प्रभावळकर यांचा 'दशावतार' प्रेक्षकांना आवडला, आतापर्यंत किती कोटी कमावले ?)

कोण आहे नेहा पेंडसे? | Who Is Neha Pendse?

अभिनेत्री नेहा पेंडसेने मराठी, हिंदी सिनेमांसह मालिकांमध्येही काम केलंय.  याव्यतिरिक्त ती दक्षिणकडील सिनेमांमध्येही झळकलीय. नेहा पेंडसेने बालकलाकार म्हणून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. तिने 1990 च्या दशकात काही हिंदी टीव्ही मालिकांमध्ये आणि जाहिरातींमध्येही काम केलंय. नेहा पेंडसे ही अभिनयासोबतच स्पष्ट बोलण्याच्या स्वभावामुळे ओळखली जाते. मराठी कलाविश्वामध्ये तिने स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. जानेवारी 2020मध्ये तिने शार्दुल सिंह बेहरोपासोबत लग्न केलं.