Rinku Rajguru Valentines Day Photo: सैराट फेम आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरु सध्या चांगलीच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच रिंकू राजगुरुने कोल्हापूरचे भाजप नेते धनंजय महाडिक यांचे पुत्र कृष्णराज महाडिक यांच्यासोबत महालक्ष्मीचे दर्शन घेतले. या भेटीनंतर रिंकू राजगुरु आणि कृष्णराज महाडिक यांच्या केमिस्ट्रीच्या चर्चा सोशल मीडियावर जोर धरत आहेत. आज रिंकूने शेअर केलेल्या व्हॅलेंटाईन डे स्पेशल लूकवरही असाच कमेंट्सचा वर्षाव पाहायला मिळत आहे.
रिंकू राजगुरु ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. सोशल मीडियावर तिच्या फोटोंची, पोस्टची जोरदार चर्चा होते. आज व्हॅलेंटाईन डे निमित्त रिंकूने आपल्या इंस्टाग्रामवर खास लूकमधील फोटो शेअर केलेत. हातात गुलाब आणि साडी घातलेले हे सुंदर फोटो नेटकऱ्यांचे लक्ष वेधत आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रिंकूच्या या कातील अदांवर चाहते चांगलेच भाळले असून पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव पाहायला मिळत आहे. मात्र यामध्ये केलेल्या काही कमेंट्सने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. 'कोल्हापूरची भावी सुनबाई, मिसेस महाडिक...' असे म्हणत नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा रिंकू राजगुरुला कृष्णराज महाडिकचे नाव घेत चिडवण्याचा प्रयत्न केला आहे.
गुलाबी फूल, सुंदर साडी आणि हातातल्या गुलाबी बांगड्या असा हा साज पाहून नेटकरी रिंकूच्या फोटोंवर चांगलेच भाळलेत. तिच्या या गुलाबी सौंदर्यावर आणखी एका मराठी अभिनेत्याने खास कमेंट केली आहे. अभिनेता स्वप्नील जोशीने रिंकूने दिलेल्या व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छांवर ओके थँक्स असे म्हटले आहे. त्यावर रिंकूनेही कमेंट केली असून तिच्या खास इमोजीने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.
दरम्यान, रिंकू राजगुरु आणि कृष्णराज महाडिक यांच्या लग्नाच्या चर्चा सुरु झाल्यानंतर स्वतः कृष्णराजने यावर स्पष्टीकरण दिले आहे. रिंकू आणि मी ठरवून देवदर्शनाला गेलेलो. आम्ही फक्त चांगले मित्र आहोत, आमच्यात दुसरे काहीही नाही, अशी प्रतिक्रिया त्याने दिली. तसेच अभिनेत्रीनेही यावर आमच्यामध्ये काही नसल्याचा खुलासा केला होता.