
Marathi Actress Childhood Photo: मराठी मनोरंजन (Marathi Film Industry) विश्वातील अभिनेते, अभिनेत्रींची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा पाहायला मिळते. माध्यमांवर कलाकारांच्या कामासंबंधी, दैनंदिन आयुष्याबद्दलच्या अनेक गोष्टी प्रसिद्ध होत असतात. अनेक कलाकारांचे बालपणीचे फोटोही सोशल मीडियावर पाहायला मिळतात. मात्र फोटो पाहून हा कलाकार नेमका कोण? हे ओळखणे अनेकदा त्यांच्या चाहत्यांनाही कठीण होते. (Marathi Actress Ketaki Mategaonkar Shared Childhood Photo)
अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो व्हायरल
सध्या सोशल मीडियावर असाच एका चिमुकलीचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. या फोटोमधील गोंडस मुलगी सध्याची आघाडीची अभिनेत्री आहे, मात्र तिला ओळखणे अगदीच अशक्य आहे. ही व्हायरल होत असलेली चिमुकली दुसरी तिसरी कोणी असून मराठी सिनेसृष्टीतील सुंदर अभिनेत्री केतकी माटेगावकर आहे. निळ्या ड्रेसमधील तिचा हा बालपणीचा फोटो खूपच क्यूट आणि सुंदर दिसत आहे.
Bobby Deol: बॉबी देओलच्या लेकाने 12 वीनंतर सोडलं शिक्षण, त्यामागचं कारण ऐकून म्हणाल...
केतकी माटेगावकरच्या क्यूटनेसवर चाहते फिदा
स्वतः अभिनेत्री केतकी माटेगावकरने (Ketaki Mategaonkar) आपल्या अधिकृत इन्टाग्राम अकाऊंटवरुन हा फोटो पोस्ट केला आहे. लहानपणापासून नेहमीच जांभळा रंग आवडतो, असंही तिने या पोस्टमध्ये सांगितले आहे. अभिनेत्रीच्या या फोटोवर तिच्या चाहत्यांना भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत. लहानपणापासूनच क्युट दिसतेस, आत्ताही तितकीच गोड, अशा कमेंट्स तिच्या चाहत्यांनी दिल्यात. काही चाहत्यांनी तर आत्ताही तशीच गोड आहेस फक्त उंची वाढली आहे, अशी खास कमेंटही केली आहे. (Actress Ketaki Mategaonkar Instagram Post)
दरम्यान, केतकी माटेगावकर तिच्या गायनासोबतच अभिनयामुळेही प्रचंड लोकप्रिय आहे. २०१४ मध्ये आलेल्या टाईमपास या सिनेमातून तिने प्रचंड लोकप्रियता मिळवली. चित्रपटातील प्राजू आणि दगडूच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं. त्यानंतर केतकीने कधीही मागे वळून पाहिले नाही. टाईमपास नंतर केतकीने तानी, शाळा, काकस्पर्श, फुंतरु अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले. तिच्या या भूमिकांचे प्रेक्षकांनी प्रचंड कौतुक केले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world