जाहिरात

Vaidehi Parshurami : निवडुंग कधी खाल्लंय का? मराठी अभिनेत्रीने चवीचवीने खाल्लं, पाहा Video

Vaidehi Parshurami : निवडुंग कधी खाल्लंय का? मराठी अभिनेत्रीने चवीचवीने खाल्लं, पाहा Video

Vaidehi Parasurami eating Cactus : मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी वैदेही परशुरामी (Vaidehi Parasurami Video) हिने कमी कालावधील चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. वैदेहीने अनेक चित्रपटांमध्ये काम केलंय. वेड लावी जीवा, कोकणस्थ, वृंदावन या मराठी चित्रपटांसह वझीर, सिंबा या हिंदी चित्रपटातही तिने चांगली भूमिका साकारली आहे. 

वैदेही फूड लव्हर आहे. तिला खाण्याची प्रचंड आवड आहे. ती नियमित आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन विविध प्रकारचे व्हिडिओ शेअर करीत असते. पर्यटनापासून विविध कार्यक्रमांचे फोटो-व्हिडिओ ती चाहत्यांसोबत शेअर करीत असते. 

दरम्यान काही दिवसांपूर्वी वैदेहीने एक व्हि़डिओ शेअर केला होता. यामध्ये ती एक वेगळाच पदार्थ खाताना दिसते. ती टाकोज नावाचा खाद्यपदार्थ खाताना दिसते. साधारणपणे भारतात पनीर किंवा चिकनचं टाकोज मिळतं. मात्र वैदेही चक्क निवडुंगाचं टाकोज खाताना दिसते. हा एक मॅक्सिकन पदार्थ आहे. ती पहिल्यांदाच निवडूंग खात असून विशेष म्हणजे तिला निवडुंगाची चव आवडली. शिवाय आपण निवडूंग खाल्ल्याचा आनंदही तिने व्यक्त केला आहे. तिने या पोस्टमध्ये म्हटलंय, मला निवडुंगानेच निवडलं. 

Manache Shlok: 'मनाचे श्लोक' चित्रपटाचे नाव अखेर बदलले, आता नव्या नावासह नव्या तारखेला होणार प्रदर्शित

नक्की वाचा - Manache Shlok: 'मनाचे श्लोक' चित्रपटाचे नाव अखेर बदलले, आता नव्या नावासह नव्या तारखेला होणार प्रदर्शित

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा...

तसं पाहता निवडुंग आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतं. यामध्ये व्हिटॅमिन सी, खनिजे, कॅल्शियम, मॅग्नेशियम, बीटालेन्ससारखे अँटिऑक्सिडंट्स असतातय याच्या नियमित सेवनाने यकृत आणि मूत्रपिंड स्वच्छ ठेवण्यात मदत मिळते. मधुमेहींसाठी निवडूंग अत्यंत फायदेशीर आहे.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com