जाहिरात

अर्रर्र.. प्रसिद्ध मराठी दिग्दर्शकाला पत्नीने रंगेहाथ पकडलं, थेट घराबाहेर काढलं; VIDEO झाला व्हायरल

मित्रानेही त्यांना तशाच स्थितीत सोडून पळ काढल्याने विजू माने यांची चांगलीच तारांबळ झाली. स्वतः अभिनेता कुशल बद्रिकेने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे.

अर्रर्र.. प्रसिद्ध मराठी दिग्दर्शकाला पत्नीने रंगेहाथ पकडलं, थेट घराबाहेर काढलं; VIDEO झाला व्हायरल

Marathi Director Viju Mane : मराठी सिनेसृष्टीतील यशस्वी दिग्दर्शक म्हणून विजू माने यांचे नाव घेतले जाते. शर्यत, शिकारी, खेळ मांडला, बायोस्कोप, असे अनेक हिट चित्रपट त्यांनी दिले. आपल्या चित्रपटांसोबतच विजू माने सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असतात. त्यांचे अनेक व्हिडिओ माध्यमांवर व्हायरल होत असतात. सध्या विजू माने यांचं पत्नीसोबत केलेलं एक रिल प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांच्या पत्नीने त्यांना थेट घराबाहेर काढल्याचं दिसत आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मराठी दिग्दर्शक विजू माने अन् अभिनेता कुशल बद्रिकेच्या मैत्रीची मराठी मनोरंजन विश्वात नेहमीच चर्चा होते. विजू माने आणि कुशल बद्रिके हे जिगरी मित्र म्हणून ्ओळखले जातात. या दोन्ही जिवलग मित्रांचा एक मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मोबाईलवर मैत्रिणीशी बोलताना रंगेहाथ सापडल्यानंतर त्यांना पत्नीने थेट घराबाहेर काढल्याचं दिसत आहे. 

त्याचं झालं असं की, विजू माने हे आपल्या मोबाईलवरुन मुलीशी गप्पा मारत होते. त्यांच्या या प्रेमाच्या गप्पा पत्नी अनघा यांनी ऐकल्या.पत्नी अनघा यांनी कोणाशी बोलतोय असं विचारल्यावर त्यांनी मित्राचं नाव घेतलं. पण, काही बोलणार नाही खरं खरं सांग? असं म्हणत पत्नीने गोड बोलून विचारणा केल्यावर विजू मानेंनी तात्काळ तमन्नाशी बोलत होतो, असं सांगितलं. तमन्नाचं नाव ऐकून संतापलेल्या पत्नीने विजू मानेंना अर्ध्यारात्री थेट घराबाहेर काढलं.

घराबाहेर काढल्यानंतर विजू मानेंनी त्यांचा जिगरी मित्र कुशल बद्रिकेला फोन केला. अशा अडचणीच्यावेळी मित्र आपल्याला आसरा देईल, अशी त्यांना अपेक्षा होती, मात्र मित्रानेही त्यांना तशाच स्थितीत सोडून पळ काढल्याने विजू माने यांची चांगलीच तारांबळ झाली. स्वतः अभिनेता कुशल बद्रिकेने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे.

पुरुष बिचारे भाबडे असतात, बायकोने दिलेल्या शब्दावर विश्वास ठेवतात. त्याचा हा मोबदला ? म्हणजे, “नेहमी खरे बोलावे ! ” हा सुविचार काय फक्त शाळेतल्या फळ्या पुरता मर्यादित होता ?“I ask for justice” विजु दादा एक मित्र म्हणून हक्काने सांगतो plz तुमची घरची लफडी तुम्ही निस्तरा.. असा भन्नाट कॅप्शनही या व्हिडिओला दिलाय. 

दरम्यान, अभिनेता कुशल बद्रिके आणि विजू मानेंच्या या सुंदर व्हिडिओवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्यात. काही नेटकऱ्यांनी स्ट्रगलर साला वेब सिरीज पुन्हा सुरु करा रे. कितीही टेन्शन असलं ना का एक तरी एपिसोड पुन्हा बघू न काढतो.सुरु करा परत विनंती आहे, अशी खास मागणीही केली आहे. 

नक्की वाचा - Walmik Karad: वाल्मीक कराडचे थेट पोलीस निरीक्षकासोबत संभाषण, ऑडिओ क्लिप व्हायरल, काय आहे बीड कनेक्शन?