मराठी मालिका आणि त्यांचा नियमित प्रेक्षक असलेल्या महिला, यांच्यातील नातंच वेगळं असतं. मालिका आवडत नसली तरी ती सोडवत नाही. बऱ्याचदा मालिकांना दूषणं देत ती आवडीने पाहिली जाते. मालिकेची वेळ हुकली तर ओटीटी किंवा युट्यूबवर मालिका पाहिली जाते. अशा या मालिकांशी घरातील महिलांचं वेगळचं नातं जुळलेलं असतं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मराठीतील प्रसिद्ध वाहिनीवरील 'ठरलं तर मग' या मालिकेला सध्या चाहत्यांची टीका सहन करावी लागत आहे. एका प्रेक्षकाने यासंदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टला अनेकांनी दुजोरा दिला असून मालिकेतील काही प्रसंगांवर आक्षेप नोंदवला आहे.
का होतोय विरोध?
चाहत्यांच्या म्हणण्यानुसार, या मालिकेतील पात्र डायनिंग टेबलावर बसून नेहमी खाताना दाखवले जातात. 'सर्वात खादाड मालिका, कधी पण पाहा, नुसते खात राहतात. सायली कधीही जेवण करून देते. या मालिकेचं नाव ठरलं तर म याऐवजी खाल्लं तर मग हे हवं होतं'. या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे. यातील एक प्रेक्षक म्हणते, या मालिकेतील सायली नुसती काम करते आणि प्रिया आयतं खात असते. कोणीही सुभेदार तिला काहीच बोलत नाही. पूर्णा आजी किंवा कल्पना तिला कधीही काहीही बोलत नाही.
तर दुसरा एक प्रेक्षक लिहितो, कधी कधी मला वाटतं, ही मालिका आहे की खाना खजाना. इतकी खादाड फॅमिली मी पाहिली नाही.