सलमान खान रात्री किती दारू पितो? पहाटे 4 वाजता उठून काय काय करतो? मिका सिंगने भाईजानसमोर सगळंच सांगितलं

Salman Khan Latest News : बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक मिका सिंगने सुपरस्टार सलमान खानचा एक मजेशीर किस्सा सांगितला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Mika Singh On Salman Khan
मुंबई:

Mika Singh On Salman Khan :  बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक मिका सिंगने सुपरस्टार सलमान खानचा एक मजेशीर किस्सा सांगितला आहे. एका पॉडकास्ट मुलाखतीदरम्यान मिकाने सांगितले की, सलमान खान ड्रिंक घेतल्यानंतर पूर्णपणे बदलतात.‘जेव्हा जेव्हा मला सलमान भाईला भेटण्याची संधी मिळते,ते मनमोकळेपणाने बोलतात.फक्त दोन ड्रिंक घेतल्यानंतर ते असे वागतात जणू मी त्यांचा मोठा भाऊ आहे. 

मिका सिंग पुढे म्हणाला, सलमान खान अतिशय दिलदार व्यक्ती आहेत.पण त्यांच्यासोबत विनोद करताना आपली मर्यादा ओळखणे गरजेचे आहे.मीकाने मजेशीर अंदाजात सांगितलं की,‘दोन पेग असो किंवा चार,हे लक्षात ठेवायला हवे की ते सलमान खान आहेत.हे लक्षात राहिलं तर कधी मार खावं लागणार नाही.मीका हसत हसत म्हणाला की, सलमानच्या उपस्थितीत वातावरण नेहमीच ऊर्जेनं भरलेले असतं आणि त्यांच्यासोबत वेळ घालवणे हा एक वेगळाच अनुभव असतो.

नक्की वाचा >>दिल्ली स्फोट प्रकरणात पुणे ATS ची धडक कारवाई! सोलापूरात 'त्या' आयटी इंजिनिअरकडे सापडले खळबळजनक पुरावे

"सलमानला रात्री उशिरा फोन करण्याची सवय.."

मिकाने म्हटलंय की, सलमान खानला उशिरा रात्री लोकांना फोन करण्याची सवय आहे.‘एकदा मी बालीमध्ये होतो,तेव्हा सलमान भाईने पहाटे ४ वाजता मला फोन केला.ते ‘किक' चित्रपटातील ‘हॅंगओव्हर' या गाण्याचा त्यांचा स्वतःचा व्हर्जन ऐकवण्यासाठी कॉल करत होते. सलमानसोबतची प्रत्येक भेट संस्मरणीय असते कारण त्यांचा ओपन आणि फ्रेंडली स्वभाव नेहमीच आश्चर्यचकित करतो.दोघांनी मिळून अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत.जसे ‘देसी बीट',‘ढिंका चिका' आणि ‘आज की पार्टी'.सलमानसोबत काम करणं आणि भेटणं हे नेहमीच एक फुल ऑन भाईजान मोमेंट असतं,असंही मीका म्हणाला.

नक्की वाचा >> Diabetes Diet Chart मधुमेह झालेल्या रुग्णांनी काय खावे अन् काय खाऊ नये? एका क्लिकवर वाचा संपूर्ण डाएटचा चार्ट

Advertisement