8 वेळा तुटलं स्वप्न, पण शेवटी मातृत्व जिंकलं! जुळ्या बाळांच्या जन्मानंतर 45 वर्षांच्या अभिनेत्रीला अश्रू अनावर

Bollywood actress motherhood journey: आई होण्याचं सुख काय असतं, हे कदाचित त्या स्त्रीलाच जास्त समजतं जिने या सुखासाठी अनेक वर्षे प्रतीक्षा केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
45 वर्षांची अभिनेत्री झाली जुळ्या मुलांची आई
मुंबई:

Bollywood actress motherhood journey: आई होण्याचं सुख काय असतं, हे कदाचित त्या स्त्रीलाच जास्त समजतं जिने या सुखासाठी अनेक वर्षे प्रतीक्षा केली आहे. टेलिव्हिजन आणि सोशल मीडियावरील प्रसिद्ध नाव संभावना सेठ हिच्या आयुष्यात अखेर तो सुवर्णक्षण आला आहे, ज्याची तिने गेली अनेक वर्षे वाट पाहिली होती. वयाच्या 45 व्या वर्षी संभावना सेठ आई झाली असून तिच्या घरी एकाच वेळी दोन चिमुकल्या पाहुण्यांचे आगमन झाले आहे. हा प्रवास तिच्यासाठी इतका खडतर होता की, ही बातमी सांगताना तिला आपले अश्रू अनावर झाले.

लढाई संघर्षाची आणि न संपणाऱ्या आशेची

संभावना सेठ आणि तिचा पती अविनाश द्विवेदी यांनी आई-बाबा होण्यासाठी केलेला संघर्ष कोणत्याही चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. आई होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी संभावनाने एक-दोनदा नव्हे, तर तब्बल 8 वेळा IVF प्रक्रियेचा आधार घेतला होता.

Advertisement

दुर्दैवाने, प्रत्येक वेळी तिच्या पदरी निराशाच आली. इतकेच नाही, तर तिला गर्भपातनाच्या (Miscarriage) भीषण वेदनांमधूनही जावे लागले. शारीरिक त्रासासोबतच मानसिकरीत्याही ती पूर्णपणे खचली होती, पण तिने आणि अविनाशने जिद्द सोडली नाही.

( नक्की वाचा : Aamir Khan Wedding: आमिर खानचं 'तीसरी बार'! कधी आणि कसं होणार सीक्रेट वेडिंग? वाचा इनसाईड डिटेल्स )

घरात अवतरले लक्ष्मी-गणेश

अनेक अपयशांनंतर अखेर विधात्याने त्यांच्या हाकेला साद दिली. संभावनाने सोशल मीडियावर एक अत्यंत भावूक पोस्ट शेअर करत आपल्याला जुळी मुले झाल्याची गूड न्यूज दिली आहे. तिने एका मुलाला आणि एका मुलीला जन्म दिला असून, यंदाची दिवाळी आमच्यासाठी लवकरच आली आहे, अशा शब्दांत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या. घरात लक्ष्मी आणि गणेश अशा दोन्ही रूपांत आनंद आल्याचे सांगताना संभावना आणि अविनाश यांचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले होते.

सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

संभावना सेठ नेहमीच तिचे वैयक्तिक अनुभव चाहत्यांशी प्रामाणिकपणे शेअर करत आली आहे. त्यामुळेच तिच्या या आनंदाच्या बातमीनंतर मनोरंजन सृष्टीतील कलाकार आणि चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अनेक महिलांसाठी संभावनाचा हा प्रवास प्रेरणादायी ठरला आहे. कठीण काळातही संयम आणि आशा जिवंत ठेवली तर चमत्कार घडतात, हेच जणू या घटनेतून सिद्ध केले आहे.
 

Advertisement