जाहिरात

Aamir Khan Wedding: आमिर खानचं 'तीसरी बार'! कधी आणि कसं होणार सीक्रेट वेडिंग? वाचा इनसाईड डिटेल्स

Aamir Khan's Third Marriage:: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट पुन्हा एकदा बोहल्यावर चढण्यासाठी सज्ज झाला आहे.

Aamir Khan Wedding: आमिर खानचं 'तीसरी बार'! कधी आणि कसं होणार सीक्रेट वेडिंग? वाचा इनसाईड डिटेल्स
Aamir Khan's Third Marriage: आमिर खानचं हे तिसरं लग्न आहे.
मुंबई:

Aamir Khan's Third Marriage:: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट पुन्हा एकदा बोहल्यावर चढण्यासाठी सज्ज झाला आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला असून आमिर खानच्या आयुष्यात एका नव्या पर्वाची सुरुवात होणार आहे. स्वत:च्या खासगी आयुष्याबाबत नेहमीच कमालीची गुप्तता पाळणारा हा अभिनेता तिसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची बातमी समोर आली आहे.

कधी होणार लग्न?

आमिर खान आणि त्याची मैत्रीण गौरी स्प्रॅट येत्या 5 जुलै रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत. हे लग्न अत्यंत साध्या पद्धतीने पार पडणार असल्याचे समजते. आमिरच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या लग्नासाठी कोणताही मोठा गाजावाजा किंवा ग्रँड सोहळा आयोजित करण्यात आलेला नाही. केवळ कुटुंबातील सदस्य आणि अत्यंत जवळचे मित्र यांच्या उपस्थितीत घरगुती स्वरूपात हा विवाह सोहळा संपन्न होईल. 

विशेष म्हणजे, केवळ काही कायदेशीर कागदपत्रांवर स्वाक्षरी करून हे नाते अधिकृत केले जाणार आहे. आमिर आणि गौरी गेल्या 1 वर्षापासून एका कुटुंबाप्रमाणे एकत्र राहत असून आता त्यांनी आपल्या नात्याला अधिकृत नाव देण्याचे ठरवले आहे.

( नक्की वाचा : Aamir Khan : 'तो खूप रोमँटिक आहे आणि रोज... आमिर खानसोबतच्या रिलेशनशिपवर गौरीचा गौप्यस्फोट )
 

कोण आहे ही गौरी स्प्रॅट?

आमिरची होणारी पत्नी गौरी स्प्रॅट ही मूळची बेंगळुरूची आहे. तिचे शिक्षण ब्लू माउंटेन स्कूलमध्ये झाले असून तिने लंडनच्या 'युनिव्हर्सिटी ऑफ द आर्ट्स'मधून फोटोग्राफी आणि स्टायलिंगचा कोर्स पूर्ण केला आहे. गौरी आणि आमिरची ओळख आजची नसून तब्बल 25 वर्षांपासून ते एकमेकांना ओळखतात. मात्र, त्यांनी एकमेकांना डेट करायला केवळ 2 वर्षांपूर्वी सुरुवात केली होती. 

गौरीला 6 वर्षांचा एक मुलगा देखील आहे. सध्या गौरी आमिर खानच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये कार्यरत असून 2025 मध्ये तिने स्वतः याबद्दल माहिती दिली होती. आमिरने तर आधीच स्पष्ट केले होते की, त्याने मनातल्या मनात गौरीला पत्नी मानले आहे.

( नक्की वाचा : माधुरी दीक्षितने ज्या गाण्याला म्हटलं होतं 'No', त्याच गाण्याने केला राडा! 32 वर्षांनंतर समोर आलं सत्य )
 

आमिर खानचा पहिला विवाह

आमिर खानने पहिले लग्न 1986 मध्ये रीना दत्ता यांच्याशी केले होते. हे लग्न अतिशय गुप्त पद्धतीने करण्यात आले होते. विशेष म्हणजे या लग्नासाठी आमिरला साधे 10 रुपये देखील खर्च करावे लागले नव्हते. रीना आणि आमिर यांचे लग्न 16 वर्षे टिकले आणि अखेर 2002 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. या दोघांना आयरा आणि जुनैद नावाची दोन मुले आहेत. घटस्फोटानंतरही आमिर आणि रीना यांचे मैत्रीचे संबंध कायम आहेत.

किरण रावसोबतचा दुसरा संसार

रीना दत्ता यांच्याशी वेगळे झाल्यानंतर आमिर खानने 2005 मध्ये चित्रपट निर्माती किरण राव यांच्याशी दुसरे लग्न केले. या दोघांना आझाद राव खान नावाचा मुलगा आहे. आमिर आणि किरण यांचा संसार 15 वर्षे सुरळीत चालला, मात्र 2021 मध्ये त्यांनी अचानक एकमेकांपासून वेगळे होत असल्याची घोषणा केली. या निर्णयाने तेव्हा सर्वांनाच धक्का बसला होता. आता किरणशी वेगळे झाल्यानंतर जवळपास 5 वर्षांनी आमिर पुन्हा एकदा संसाराची नवीन इनिंग सुरू करण्यासाठी सज्ज झाला आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com