Drishyam 3 Release Date : अजय देवगण दरवर्षीप्रमाणे यंदाही 3-4 वेळा मोठ्या पडद्यावर धमाका करणार आहेत. म्हणजेच त्यांच्या खात्यात मोठ्या चित्रपटांचा समावेश आहे. मागील वर्षाच्या तुलनेत 2026 वर्ष त्यांच्या दृष्टीने अधिक उत्तम ठरेल. गेल्या वर्षी त्यांचे दोन चित्रपट फ्लॉप झाले होते. पण मोहनलाल यांच्या बहुप्रतिक्षित ‘दृश्यम 3' चित्रपटाची संपूर्ण सिनेविश्वात चर्चा रंगली आहे. जबरदस्त क्राईम थ्रिलर, सस्पेन्स आणि श्वास रोखून धरणारी कहाणी या चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे. मोहनलाल यांच्या ‘दृश्यम 3'च्या रिलीज डेटबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ‘दृश्यम 3' हा चित्रपट 2 एप्रिल 2026 रोजी वर्ल्ड वाईड प्रदर्शित होणार आहे.
'‘दृश्यम'ची मूळ आवृत्ती मल्ल्यालममध्ये तयार करण्यात आली होती आणि आता त्याचा तिसरा भाग रिलीज होणार आहे. मोहनलाल यांचा हा चित्रपट 2 एप्रिलला रिलीज होणार असून चाहत्यांची हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हा चित्रपट इतर काही भाषांमध्येही रीमेक करण्यात आला आहे. ज्यात हिंदी, तामिळ आणि कन्नड भाषांचा समावेश आहे. आता व्यंकटेश ‘दृश्यम 3' चा तेलुगु रिमेक आणण्याच्या तयारीत आहेत. मल्ल्यालम फिल्ममेकर जीतू जोसेफ यांनी दृश्यम फ्रँचायझीमुळे जबरदस्त लोकप्रियता मिळवली आहे. हा चित्रपट विविध भाषांमध्ये रिमेक करण्यात आला आणि प्रत्येक ठिकाणी सुपरहिट ठरला. सध्या जीतू जोसेफ दृश्यम 3 चे (मल्ल्यालम) दिग्दर्शन करत आहेत. दरम्यान, व्यंकटेश यांनी या चित्रपटाच्या तेलुगु आवृत्तीवर काम करण्यासाठी साइन केले होते.
नक्की वाचा >> Pune News: पुरंदर विमानतळ प्रकल्प रखडणार? जमिनीच्या मोजणीला 'या' गावातील शेतकऱ्यांचा कडाडून विरोध, कारण काय?
‘दृश्यम 3' व्यंकटेशसाठी रिस्क फॅक्टर ठरणार?
जेव्हा ‘दृश्यम 3' थिएटरमध्ये प्रदर्शित होईल, तेव्हा व्यंकटेश चित्रपटाच्या तेलुगु आवृत्तीचे शूटिंग सुरूही करणार नाहीत. मात्र, थिएटरनंतर हा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवरही उपलब्ध होईल. अशा परिस्थितीत, प्रेक्षकांचा रीमेक पाहण्याचा उत्साह कमी होतो. कारण ते आधीच मूळ चित्रपट पाहून घेतात. यामुळे ‘दृश्यम 3' व्यंकटेशसाठी रिस्क फॅक्टर बनू शकतो. कारण तोपर्यंत मल्ल्यालम आवृत्ती रिलीज होईल. चित्रपटाची संपूर्ण कथा समोर येईल आणि लोक ती आधीच पाहतील. व्यंकटेश यांनी करिअरमध्ये 75 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे.
नक्की वाचा >> Pune News : आयटी पार्क हिंजवाडीत ट्रॅफिक जॅम अन्...मेट्रो स्टेशन परिसरात दुर्देवी घटना, नेमकं काय घडलं?
अजय देवगण आणि त्यांची टीम दृश्यम 3 च्या हिंदी आवृत्तीसाठी वेगळ्या कथानकावर काम करत आहे. त्यावर आधारित हिंदी व्हर्जन 2 ऑक्टोबर 2026 रोजी रिलीज केले जाणार आहे. अशा परिस्थितीत तेलुगु आवृत्तीसाठीही हा मोठा रिस्क फॅक्टर ठरू शकतो. तेलुगु रीमेक बनवला जाईल की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तसेच, जर अजय देवगणच्या व्हर्जनचा प्लॉट प्रेक्षकांना आवडला नाही, तर हा सुद्धा एक मोठा रिस्क फॅक्टर ठरेल.