मौनी रॉयने 19 वर्षाची असतानाच घेतला होता 'हा' मोठा निर्णय, वेडीपिसीच झाली होती, जुना व्हिडीओ व्हायरल

मौनीचा एक जुना व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला आहे. 'झूम'ला मुलाखत देताना मौनीने म्हटलं होतं की,जेव्हा मी 19 वर्षांची होती.तेव्हा मला लग्नाचं वेड लागलं होतं.

जाहिरात
Read Time: 2 mins
Mouni Roy Latest News Update

Mouni Roy : मौनी रॉय आणि सूरज नाम्बियार यांनी चार वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर घटस्फोट घेत असल्याचं संयुक्तपणे जाहीर केलं आहे. 14 मे रोजी सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये त्यांनी घटस्फोटाची घोषणा केली. अशातच मौनीचा एक जुना व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला आहे. 'झूम'ला मुलाखत देताना मौनीने म्हटलं होतं की,जेव्हा मी 19 वर्षांची होती.तेव्हा मला लग्नाचं वेड लागलं होतं. या अशा गोष्टी आहेत,ज्यामुळे तुम्हाला आपलसं वाटतं."

मौनीने पुढं म्हटलं, "तुम्हाला माहित आहे..खूप साऱ्या सिंगल मुली आहेत, ही मोठी समस्या आहे.माझ्या खूप मैत्रिणी सिंगल आहेत. दोन माणसं एकत्र येण्याबाबत जेव्हा मी विचार करते,तेव्हा मला असा व्यक्ती दिसत नाही, जो त्याच्या लायक असेल".योग्य पार्टनर शोधण्यात तुलाही वेळ लागला का?असा प्रश्न मौनीला विचारण्यात आला. यावर ती म्हणाली,मला जवळपास 2.5 ते 3 वर्षांपर्यंत वाट पाहावी लागली.जेव्हा तुम्ही या गोष्टींच्या मागे जाणं सोडून देता,तेव्हा तुमच्यासाठी जे बनवलं गेलं आहे, ते तुमच्याकडे आकर्षित होत असतं."

Advertisement

नक्की वाचा >> Dr.Anand Nadkarni Death: शस्त्रक्रियेनंतरची झुंज अपयशी; प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन

मौनी-सूरजने नेमकं काय म्हटलंय? 

मौनी आणि सूरजने संयुक्तपणे प्रतिक्रिया देत म्हटलंय की,मीडियाच्या काही घटकांकडून आमच्या वैयक्तिक जीवनाबाबत अनावश्यक गोष्टी पसरवल्या जात आहेत, ते पाहून आम्हाला दु:ख झालं आहे. आम्हाला हे सांगायचं आहे की, आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. याप्रकरणी दोघेही वैयक्तिक सहमतीने मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असून त्यासाठी आम्ही आवश्यक तो वेळ घेत आहोत. 

त्यांनी म्हटलं की, हा प्रसंग आपापसात आणि शांतपणे मिटवण्याकडे आम्ही लक्ष देत आहेत.आमच्यात मैत्रिचे संबंध कायम राहतील. आम्ही नम्रपणे सर्वांना विनंती करतो की,लोकांनी आम्हाला प्रायव्हसी द्यावी. माझ्या आणि सूरजबाबत कोणतीही खोटी माहिती पसरवू नये.आम्ही तुम्हा सर्वांकडून अपेक्षा करतो की,या कठीण काळात तुम्ही आमच्या वैयक्तिक आयुष्याचा आदर ठेवावा.सर्व मीडिया हाऊसला विनंती आहे की, अशा कव्हरेजपासून सावध राहा."