Dr.Anand Nadkarni Passes Away: प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांचे आज (15 मे 2026) रोजी पहाटे 5 वाजेच्या सुमारास निधन झाले. वयाच्या 68व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने वैद्यकीय, सामाजिक आणि साहित्य क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. मित्रपरिवार आणि फॉलोअर्संनाही मोठा धक्का बसला आहे.
शस्त्रक्रियेनंतर निर्माण झाली होती गुंतागुंत
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. आनंद नाडकर्णी यांच्यावर मागील आठवड्यात एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पण त्यानंतर त्यांच्या तब्येतीमध्ये काही वैद्यकीय गुंतागुंत (Complications) निर्माण झाली. मुंबईतील परळ भागातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही उपचारादरम्यान आज पहाटे त्यांचे निधन झाले.
(नक्की वाचा : Re-NEET Schedule: सर्वात मोठी बातमी! नीट परीक्षेची नवी तारीख जाहीर; NTA कडून घोषणा)
ठाण्यात अंत्यदर्शन
डॉ. नाडकर्णी यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठाणे येथील 'सप्तसोपान' कार्यालयात आणण्यात येणार आहे. आज सकाळी 10.30 वाजल्यापासून नागरिकांना, त्यांच्या चाहत्यांना आणि नातेवाईकांना त्यांचे अंतिम दर्शन घेता येईल, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.
मानसिक आरोग्याला लोकचळवळ बनवणारे व्यक्तिमत्त्वडॉ. आनंद नाडकर्णी यांनी मानसिक आरोग्य हा विषय केवळ क्लिनिकपुरता मर्यादित न ठेवता तो सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवला. डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक अत्यंत संवेदनशील मानसोपचारतज्ज्ञ, मार्गदर्शक आणि समाजसुधारक गमावला आहे. त्यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी शोक व्यक्त केला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world