Mrunal Thakur: श्रेयस अय्यर की धनुष? मृणाल ठाकूर कोणाला डेट करतेय? अभिनेत्रीने दिला चाहत्यांना धक्का

बॉलिवूडपासून ते साऊथच्या चित्रपटांमध्ये अप्रतिम अभिनयाची छाप टाकून अभिनेत्री मृणाल ठाकूरने नावलौकीक मिळवलं आहे. मृणाल सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक बनली आहे. अशातच तिच्या डेटिंगच्या चर्चांबाबत मोठी माहिती समोर आलीय.

जाहिरात
Read Time: 2 mins
Mrunal Thakur On Dating Rumours
मुंबई:

Mrunal Thakur On Dating Rumours :  बॉलिवूडपासून ते साऊथच्या चित्रपटांमध्ये अप्रतिम अभिनयाची छाप टाकून अभिनेत्री मृणाल ठाकूरने नावलौकीक मिळवलं आहे. मृणाल सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक बनली आहे. तिच्या आगामी प्रोजेक्ट्सपेक्षा ती सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अधिक चर्चेत आहे. ती भारतीय क्रिकेटपटू श्रेयस अय्यरला डेट करत आहे, अशा चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या. परंतु, यापूर्वी मृणालचे नाव साऊथ अभिनेता धनुषसोबत जोडले गेले होते. आता या चर्चांवर मृणालने पडदा टाकत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. 

मृणाल ठाकूरने एक इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे, ज्यात ती आपल्या आईसोबत हसताना दिसत आहे. तिची आई तिची हेड मसाज करत असल्याचा फोटोत पाहायला मिळत आहे. हे फोटो शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘ते बोलतात, आम्ही हसतो. पी.एस. अफवा म्हणजे फ्री पीआर आणि मला फ्री गोष्टी खूप आवडतात'. 

मृणाल ठाकूरने इन्स्टा स्टोरीत केला डेटिंगचा उल्लेख? सत्य काय?

मृणाल ठाकूरने तिच्या इंन्स्टास्टोरीमध्ये थेट डेटिंगच्या चर्चांचा उल्लेख केलेला नाही. पण तिच्या पोस्टवरून नेटिझन्स असा अंदाज लावत आहेत की तिने क्रिकेटपटू श्रेयस अय्यरसोबतच्या डेटिंगच्या अफवांवर प्रतिक्रिया दिली आहे. यासोबतच तिने या अफवांबाबत तिच्या आईसोबत चर्चा केली आणि त्यांची खिल्ली उडवली. अफेअरच्या चर्चांमध्ये काहीही सत्य नसल्याचं मृणालने म्हटलं आहे.

नक्की वाचा >> सुधीर मुनगंटीवारांचं टेन्शन वाढलं? 'या' उमेदवारांसाठी भाजपच्या विरोधात गौतमी पाटील मैदानात, Video व्हायरल

गेल्या काही दिवसांपासून मृणाल ठाकुर आणि श्रेयस अय्यर यांच्या अफेअरच्या बातम्या चर्चेत आहेत. अलीकडेच रेडिट (Reddit) युजर्सनी दोघांचे एकत्र फोटो शेअर करून दावा केला होता की, ते सतत एकमेकांना भेटत आहेत.  या बातम्यांवर मृणालसह श्रेयसनेही कोणतीही प्रतिक्रिया दिली नाहीय. श्रेयस अय्यरपूर्वी मृणालचे नाव अभिनेता धनुषसोबत जोडले गेले होते. यावरही तिने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 

Advertisement

या चित्रपटांमध्ये झळकली मृणाल ठाकूर

मृणाल गेल्या काही वर्षांपासून एकापाठोपाठ हिट चित्रपट देत आहे. 2022 मध्ये ‘सीता रामम'मध्ये चाहत्यांची मने जिंकल्यानंतर तिने ‘गुमराह', ‘लस्ट स्टोरीज 2', ‘आंख मिचौली', ‘पीपा', ‘द फॅमिली स्टार', ‘कल्कि 2898 एडी' आणि ‘सन ऑफ सरदार 2' सारख्या चित्रपटांद्वारे खळबळ उडवली. आता ती लवकरच ‘सन ऑफ सरदार 2'मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट 1 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. याशिवाय तिच्या आगामी चित्रपटांमध्ये ‘है जवानी तो इश्क होना है', ‘डकैत' आणि ‘दो दीवाने शहर में' यांचा समावेश आहे.

Advertisement

नक्की वाचा >> Thane Shocking News: ठाणे जिल्ह्यात खळबळ! मीरा रोड येथील 'या' शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी