Gautami Patil Viral Video : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजल्यापासून सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. काही राजकीय नेते सिनेकलाकारांच्या माध्यमातून प्रचाराचा नारळ फोडत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच चंद्रपूर जिल्ह्यातील मूल नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार एकता समर्थ आणि काँग्रेस उमेदवारांचाही व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यांच्या प्रचारासाठी डान्सर आणि अभिनेत्री गौतमी पाटीलने मूल शहरात मोठा रोड शो केला.या रोड शोमध्ये अनेक राजकीय कार्यकर्त्यांसह नागरिक उपस्थित होते. ढोल-ताशांच्या गजरात हा रोड शो पार पडला.
गौतमी पाटील माध्यमांशी बोलताना काय म्हणाली?
यावेळी गौतमी पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाली, "मला इथं येऊन खूप छान वाटतंय. मी अनेक ठिकाणी जाते.सर्व ठिकाणी मला भरभरून प्रेम मिळतंय. मूल शहराच्या विकासासाठी काँग्रेस पक्षातील उमेदवारांना आणि नगराध्य पदाकरिता उभ्या असलेल्या एकता समर्थ यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा", असं आवाहनही गौतमीनं यावेळी केलं आहे.
नक्की वाचा >> ठाणे जिल्ह्यात खळबळ! मीरा रोड येथील 'या' शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी
इथे पाहा गौतमी पाटीलच्या रोड शो चा व्हायरल व्हिडीओ
— Naresh Shende (@NareshShen87640) December 1, 2025
आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रसिद्ध लावणी कलावंत गौतमी पाटीलने मूल येथे काँग्रेससाठी प्रचार केला. या 'रोड शो'च्या माध्यमातून काँग्रेसला विजयी करण्याचं आवाहन गौतमी पाटीलने केलं. एकता समर्थ मूल शहरासाठी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत. हे क्षेत्र भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदारसंघात येत असल्याने इथे शेवटच्या क्षणी काँग्रेसने आपली ताकद पणाला लावली आहे.
नक्की वाचा >> हिवाळ्यात तोंडातून धुरासारखी सफेद वाफ बाहेर का पडते? 99 टक्के लोकांना महितच नाही यामागचं कारण
गौतमी पाटीलची लोकप्रियता पाहता उमेदवारांनी तिचा रोड शो केल्याचं सांगितलं जात आहे. या रोड शोला तरुणाईचा मोठा प्रतिसाद मिळाला.दरम्यान, राज्यातल्या नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठीच्या निवडणुकीसाठी प्रचाराचा आज शेवटचा दिवस होता. विविध पक्षांचे नेते मतदारांचा कौल मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.आज रात्री 10 वाजता हा प्रचार संपणार आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world