Mumbai Crime News : टीव्ही इंडस्ट्रीच्या होळी पार्टीला गालबोट; अभिनेत्रीसोबत सहकलाकाराची जबरदस्ती

अभिनेत्रीने दावा केला की ती एका स्टॉलच्या मागे लपली होती. त्यावेळी तो अभिनेता तिथे आला आणि त्याने तिला जबरदस्तीने रंग लावला. जबाबात तिने म्हटले आहे की, तिने तिचा चेहरा झाकला होता.

जाहिरात
Read Time: 2 mins

टीव्ही इंडस्ट्रीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका टेलिव्हिजन अभिनेत्रीला तिच्या सहकलाकाराने त्रास दिल्याची घटना समोर आली आहे. मुंबईतील होळीच्या पार्टीत ही घटना घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

29 वर्षीय अभिनेत्रीने तिच्या तक्रारीत दावा केला आहे की, तिचा सहकारी दारू पिऊन होता आणि त्याने जबरदस्तीने तिच्यावर रंग लावले. होळीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या पार्टीमध्ये ही घटना घडली. घटना घडली त्यावेळी तिथे बरेच लोक उपस्थित होते.

( नक्की वाचा- Aamir Khan : 'तो खूप रोमँटिक आहे आणि रोज... आमिर खानसोबतच्या रिलेशनशिपवर गौरीचा गौप्यस्फोट)

अभिनेत्रीने दावा केला की ती एका स्टॉलच्या मागे लपली होती. त्यावेळी तो अभिनेता तिथे आला आणि त्याने तिला जबरदस्तीने रंग लावला. जबाबात तिने म्हटले आहे की, तिने तिचा चेहरा झाकला होता. पण त्याने तिला जबरदस्तीने पकडले आणि तिच्या गालावर रंग लावला. हा सगळा प्रकार करत असताना तो तिला 'I Love You' म्हणत होता. तसेच 'बघूया तुला माझ्यापासून कोण वाचवतं,' असंही म्हणत असल्याचं सूत्रांनी सांगितलं. 

( नक्की वाचा : Kartik Aryan : 23 व्या वर्षीच 2 मुलांची आई! कोण आहे Sreeleela जिला कार्तिक आर्यन करतोय डेट? )

त्याने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. त्यानंतर मी त्याला ढकलले. हे सगळं घडलं त्यावेळी मला मानसिक धक्का बसला,  असंही अभिनेत्रीने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. अभिनेत्रीच्या मित्रांनी यावेळी मध्यस्थी केली. मात्र अभिनेत्याने त्यांनाही धक्काबुक्की केली, असाही आरोप तिने केला. 

Advertisement

अभिनेत्रीने याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी अभिनेत्याविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी अभिनेत्याची चौकशी केली असून पुढील तपास सुरु आहे. 

Topics mentioned in this article