Rohit Shetty News: खळबळजनक! दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घराबाहेर गोळीबार; 4 राऊंड फायर.. पोलीस अलर्ट

अज्ञात व्यक्तीने रोहित शेट्टीच्या घराबाहेर गोळीबार केला आणि घटनास्थळावरुन पळून गेला. या गोळीबाराचे कारण अद्याप समोर आले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Rohit Shetty  House Firing: हिंदी सिनेविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध प्रसिद्ध बॉलीवूड निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घराबाहेर गोळीबार झाल्याची खळबळजनक बातमी समोर आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने रोहित शेट्टीच्या घराबाहेर गोळीबार केला आणि घटनास्थळावरुन पळून गेला. या गोळीबाराचे कारण अद्याप समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला असून सर्वजण सुरक्षित असल्याचे सांगितले आहे. 

दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घराबाहेर गोळीबार

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टच्या घराबाहेर अज्ञात हल्लेखोरांकडून चार राउंड फायर करण्यात आले. यानंतर, जुहू येथील रोहित शेट्टी यांच्या घराभोवती मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात करण्यात आले आहेत. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी केली जात आहे आणि हल्लेखोरांची ओळख पटविण्यासाठी प्रत्येक संभाव्य दृष्टिकोनातून तपासणी केली जात आहे. हल्ल्यामागील कारण अद्याप समजलेले नाही.

चार राऊंड फायर

रोहित शेट्टी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये मुंबई पोलिसांसोबत दिसला होता. तो मुंबईचे माजी पोलिस आयुक्त राकेश मारिया यांच्या बायोपिकवर काम करत आहे, जो जवळजवळ पूर्ण झाला आहे. रोहित शेट्टी फेब्रुवारीमध्ये अजय देवगण अभिनीत "गोलमाल" चित्रपटाचे चित्रीकरण देखील सुरू करणार आहे.

दरम्यान, रोहित शेट्टी हा एक प्रसिद्ध बॉलीवूड निर्माता-दिग्दर्शक आहे, जो त्याच्या अ‍ॅक्शन आणि कॉमेडी चित्रपटांसाठी ओळखला जातो. त्याच्या लोकप्रिय चित्रपटांमध्ये सिंघम, चेन्नई एक्सप्रेस आणि गोलमाल यांचा समावेश आहे. तो टीव्ही रिअॅलिटी शो "खतरों के खिलाडी" चा होस्ट म्हणून देखील लोकप्रिय आहे.

Advertisement

Ajit Pawar Death : अजितदादांना अनोखी श्रद्धांजली! 'साडे माडे 3' च्या टीमचा काळजाला भिडणारा निर्णय