जाहिरात

Ajit Pawar Death : अजितदादांना अनोखी श्रद्धांजली! 'साडे माडे 3' च्या टीमचा काळजाला भिडणारा निर्णय

Punha Sade Maade 3 Postponed:  अजित पवारांच्या निधनानंतर मराठी मनोरंजन सृष्टीने आपली संवेदनशीलता जपली असून एका मोठ्या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

Ajit Pawar Death : अजितदादांना अनोखी श्रद्धांजली! 'साडे माडे 3' च्या टीमचा काळजाला भिडणारा निर्णय
Ajit Pawar Death : अजित पवारांच्या निधनानंतर मराठी चित्रपटाचं प्रदर्शन पुढं ढकलण्यात आले आहे.
मुंबई:

Punha Sade Maade 3 Postponed:  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण राज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बुधवारी 28 जानेवारी 2026 रोजी झालेल्या या भीषण विमान अपघाताने राजकीय क्षेत्रासह सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रालाही मोठा धक्का बसला आहे. आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी आज गुरुवारी 29 जानेवारी 2026 रोजी बारामतीमध्ये जनसागराचा महापूर लोटला होता. 

राज्य सरकारने या निधनानंतर 3 दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर मराठी मनोरंजन सृष्टीनेही आपली संवेदनशीलता जपली असून एका मोठ्या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

( नक्की वाचा : Ajit Pawar: विमानाची ती सुरक्षा यंत्रणा आणि 28 दिवसांची डेडलाईन; अजित पवारांच्या अपघाताबाबत सर्वात मोठा खुलासा )

मनोरंजन क्षेत्राचा मोठा निर्णय

अजित पवार यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी आणि राज्यावरील शोककळा पाहता मराठी चित्रपट पुन्हा एकदा साडे माडे 3 चे प्रदर्शन आता लांबणीवर टाकण्यात आले आहे. हा बहुप्रतिक्षित चित्रपट आधी 30 जानेवारी 2026 रोजी प्रदर्शित होणार होता. 

मात्र महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती आणि अजितदादांना आदरांजली वाहण्यासाठी निर्मात्यांनी हा महत्त्वपूर्ण बदल केला आहे. या निर्णयामुळे मराठी चित्रपटसृष्टीने आपल्या लाडक्या नेत्याप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त केली आहे.

( नक्की वाचा : Ajit Pawar Death : अजित पवारांच्या मृत्यूनंतर 5 बदल अटळ, फडणवीस ते शरद पवार सर्वांची कशी वाढणार डोकेदुखी ? )
 

अल्ट्रा मराठीची भावूक पोस्ट

या चित्रपटाचे निर्माते असलेल्या अल्ट्रा मराठीने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. हा धक्का अत्यंत वेदनादायी असून प्रत्येक मराठी मन आज हळहळत आहे. 

या दुःखद प्रसंगी आम्हीही या शोकभावनेत सहभागी आहोत. संवेदनशीलतेची जाणीव ठेवत आम्ही पुन्हा एकदा साडे माडे 3 या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलत आहोत. या कठीण काळात आम्ही पवार कुटुंबिय आणि संपूर्ण महाराष्ट्रासोबत आहोत.

चित्रपटाची मोठी स्टारकास्ट

पुन्हा एकदा साडे माडे 3 हा चित्रपट 19 वर्षांपूर्वी गाजलेल्या साडे माडे तीन या चित्रपटाचा सिक्वल आहे. विशेष म्हणजे पहिल्या भागाप्रमाणेच या भागाचे दिग्दर्शनही अभिनेता आणि दिग्दर्शक अंकुश चौधरी यांनी केले आहे. या चित्रपटाची कथा स्वतः अंकुश चौधरी यांची असून संदीप दंडवते यांनी पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. या चित्रपटात मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार एकत्र दिसणार आहेत.

या चित्रपटात अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे आणि सिद्धार्थ जाधव ही लोकप्रिय चौकडी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. त्यांच्यासोबतच रिंकू राजगुरू, संकेत पाठक, संजय नार्वेकर आणि समृद्धी केळकर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते, मात्र आता अजितदादांच्या निधनामुळे चित्रपटाच्या नवीन तारखेची घोषणा काही काळानंतर केली जाण्याची शक्यता आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com