Dhurandhar Latest News : रणवीर सिंग स्टारर ‘धुरंधर' सिनेमा मागील काही दिवसांपासून प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. या सिनेमानं गेल्या दहा दिवसांत 500 पेक्षा जास्त कोटी रुपयांची कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसवर गाजलेल्या या सिनेमाबाबत दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. हा सिनेमा पाहणारे लोक फक्त कथानक आणि अभिनयाबद्दलच नाही, तर तो सिनेमा किती भावनात्मक आहे, याबाबतही चर्चा करत आहेत.
‘धुरंधर'मध्ये मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्याची दु:खद स्टोरी दाखवण्यात आली आहे. यामुळे जुन्या आणि वेदनादायक आठवणी ताज्या झाल्या आहेत. त्यापैकीच एक आहेत रजिता बग्गा. त्या ताज हॉटेलमध्ये 26/11 च्या भयानक रात्री तब्बल 14 तास अडकल्या होत्या. पण सुदैवाने त्या हल्ल्यातून सुरक्षित बाहेर पडल्या. अनेक वर्षांनंतर जेव्हा त्यांनी रणवीर सिंगचा ‘धुरंधर'सिनेमा पाहिला,तेव्हा त्या भावूक झाल्या आणि त्या रात्रीच्या आठवणी पुन्हा त्यांच्या डोळ्यांसमोर आल्या. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
नक्की वाचा >> सारा अर्जुन का बनली 'धुरंधर'ची हिरोईन? 1300 मुलींमध्ये कशी झाली निवड? डायरेक्टर म्हणाले, "पार्ट 2 मध्ये.."
"14 तासांनंतर आम्हाला जिवंत बाहेर काढण्यात आलं.."
रजत यांनी म्हटलं की, “मी 26/11 च्या रात्री माझा पती अजय बग्गा यांच्यासोबत ताज हॉटेलमध्ये होते.त्या भयानक दहशतवादी हल्ल्यातून वाचलो. आम्ही नशिबवान होतो. 14 तासांनंतर आम्हाला जिवंत बाहेर काढण्यात आले.माझ्यासाठी ‘धुरंधर'मधील सर्वात अंगावर काटा आणणारा सीन म्हणजे ती लाल स्क्रीन होती, जिथे 26/11 च्या दहशतवाद्यांच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या खऱ्या आवाजाची रेकॉर्डिंग वाजवण्यात आली होती. दहशतवाद्यांचे आका त्यांना कशाप्रकारे निर्देश देत होते, हे किती क्रूर, अमानवीय आणि घृणास्पद होते. ते पाहून माझ्या अंगावर शहारे आले.बॉम्ब फुटल्यावर आणि प्रत्येक व्यक्ती मारल्या गेल्यावर ते कशाप्रकारे आनंद साजरा करत होते. हे पाहून आपल्या तळपायाची आग मस्तकात जाईल,हे नक्की..
नक्की वाचा >> 'धुरंधर' अर्जुन रामपालचं पहिल्या पत्नीसोबत का बिनसलं? 'या' अभिनेत्रीनं मोडला दोघांचा 20 वर्षांचा संसार?
धुरंधर सिनेमाच्या त्या सीनबाबत नेमकं काय म्हणाली?
त्यांनी पुढं म्हटलंय, 17 वर्षे झाली आहेत,पण जे घडले आणि आमच्यासोबत काय होऊ शकले असते,त्या आठवणींमुळे मला मोठा धक्का बसला आहे. सर्वकाही हृदय पिळवटून टाकणारे आणि वेदनादायक. 26/11 ला नेमकं काय घडलं होतं? हे धुरंधर सिनेमाच्या 2-3 मिनिटांत नवीन पिढीला समजून घेता येईल. याचं श्रेय या सिनेमाच्या टीमला आणि निर्मात्यांना जातं. रणवीर सिंगचा तो लुक संपूर्ण पिढीला अस्वस्थ करणारा आहे.धुरंधर'मध्ये रणवीर सिंगसोबत अक्षय खन्ना, संजय दत्त, अर्जुन रामपाल, आर. माधवन आणि सारा अर्जुन महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसतात.हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे.सिनेमाने आतापर्यंत 411.26 कोटींची कमाई केली आहे.