जाहिरात

सारा अर्जुन का बनली 'धुरंधर'ची हिरोईन? 1300 मुलींमध्ये कशी झाली निवड? डायरेक्टर म्हणाले, "पार्ट 2 मध्ये.."

रणवीर सिंग स्टारर धुरंधर सिनेमानं फक्त 10 दिवसांतच 500 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. परंतु, या सिनेमाच्या कास्टिंगबाबत सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरु आहेत.

सारा अर्जुन का बनली 'धुरंधर'ची हिरोईन? 1300 मुलींमध्ये कशी झाली निवड? डायरेक्टर म्हणाले, "पार्ट 2 मध्ये.."
Ranveer Singh and Sara Arjun Age Gap Gossip

Dhurandhar Casting Facts : रणवीर सिंग स्टारर धुरंधर सिनेमानं फक्त 10 दिवसांतच 500 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. धुरंधरने अनेक विक्रम मोडून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या सिनेमाचे हिरो-हिरोईन रणवीर सिंग आणि सारा अर्जून यांच्या केमिस्ट्रीबाबतही सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे. विशेष म्हणजे रणवीर सिंग आणि सारा यांच्यातील वयाच्या फरकाबाबत मिश्किल टिप्पणी केली जात आहे.रणवीर सिंग (40) आणि सारा (20) यांचा धुरंधर सिनेमातील अभिनय पाहण्यासाठी चित्रपटगृहात प्रेक्षकांची तोबा गर्दी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच धुरंधरचे कास्टिंग दिर्गदर्शक मुकेश छाबरा रणवीर-सारावर होणाऱ्या टीकेबद्दल प्रतिक्रिया दिलीय. त्यांनी दोघांच्या वयात असलेल्या फरकावर मोठं विधान केलं आहे.

"26-27 वर्षांच्या चांगल्या कलाकारांचा अभाव.."

फ्री प्रेस जर्नलला दिलेल्या एका मुलाखतीत मुकेश यांनी स्पष्ट केले की, "वयातील फरक आवश्यक होता. सिनेमाच्या कथेनुसार अशी कास्टिंग करण्यात आली. हिरो हिरोईनला फसवण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे या रोलसाठी 20-21 वर्षांची अभिनेत्री योग्य ठरेल, असं आम्हाला वाटलं. जेव्हा पार्ट 2 येईल, तेव्हा वयाच्या फरकाबद्दल बोलणाऱ्या सर्वांना "सर्व उत्तरे मिळतील.आमच्याकडे 26-27 वर्षांच्या चांगल्या कलाकारांचा अभाव आहे, असं नाहीय. आमच्याकडे चांगले कलाकार आहेत. पण हा वयाचा फरक चित्रपटात आवश्यक होता. तुम्ही प्रत्येक गोष्ट लोकांना समजावून सांगू शकत नाही. जेव्हा मी सुद्धा वयाच्या फरकाबद्दल वाचत होतो, तेव्हा मला ते हास्यास्पद वाटले. सिनेमाच्या कथेनुसार हे योग्य आहे."

नक्की वाचा >> 'धुरंधर' अर्जुन रामपालचं पहिल्या पत्नीसोबत का बिनसलं? 'या' अभिनेत्रीनं मोडला दोघांचा 20 वर्षांचा संसार?

धुरंधर पार्ट 2 या तारखेला होणार प्रदर्शित

मुकेश छाबरा पुढे म्हणाले की, "ते खूप आनंदी आहेत की आदित्यसह अनेक दिग्दर्शक आता नव्या लोकांना अधिक संधी देत आहेत.
कास्टिंगबद्दल आपले मत व्यक्त करताना त्यांनी म्हटलं,"माझी कल्पना अशी होती की आपण एक संपूर्ण जग तयार करत आहोत. त्यामुळे आम्ही सरप्राईज कास्टिंगचा विचार केला.

नक्की वाचा >> 18 महिन्यांतच कॅमेरा फेस केला! 100 जाहिराती, साऊथ इंड्रस्ट्रिही गाजवली, कोण आहे 'धुरंधर'ची सारा अर्जुन? 

अभिनेत्री नवखी दिसायला हवी. जरी ती चाइल्ड आर्टिस्ट राहिली असली आणि चाइल्ड आर्टिस्ट म्हणून काही चित्रपट केले असले, तरी आम्हाला एक नवीन दृष्टिकोन द्यायचा होता. म्हणूनच मी सारासोबत काम करत आहे आणि ती ऑडिशनसाठी येते. ती खरंच एक गोड मुलगी आहे. जेव्हा साराने ऑडिशन दिले, तेव्हा त्यांनी तिच्या गोड चेहऱ्यामागे लपलेली प्रतिभा पाहिली. मुकेश यांनी शेवटी सांगितले,"ती एक खूप चांगली अभिनेत्री आहे. तुम्ही हे पार्ट 2 मध्ये पाहाल.धुरंधर पार्ट 2 19 मार्च 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com