दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रूथ प्रभू हिने निर्माता, दिग्दर्शक राज निदीमोरू याच्याशी लग्न केलं आहे. (Samantha Raj Nidimoru Wedding) सोमवारी कोयंबतूर येथील इशा योगा सेंटरमध्ये या दोघांनी सप्तपदी घेतली. गेल्या अनेक दिवसांपासून समांथा आणि राज यांच्यात प्रेमाचं नातं फुलल्याच्या चर्चा सुरू होत्या. या दोघांनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट केल्यानंतर या चर्चा खऱ्या ठरल्या. समांथा हिचं पहिलं लग्न अभिनेता नागा चैतन्य याच्याशी झालं होतं. या दोघांनी घटस्फोट घेतल्यानंतर नागा चैतन्य याने अभिनेत्री शोभिता धुलिपाला (Naga Chaitanya and Sobhita Dhulipala) हिच्याशी लग्न केलं होतं. नागाचं लग्न झाल्यानंतर समांथाच्या चाहत्यांनी नागा चैतन्य आणि खासकरून शोभितावर टीकेची झोड उठवली होती. शोभिताने नागा चैतन्य आणि समांथाच्या नात्यात मिठाचा खडा टाकला असा आरोप या चाहत्यांनी केला होता. नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या लग्नाला 4 डिसेंबरला 1 वर्ष पूर्ण होतंय.त्याच्या 3 दिवस आधी समांथा आणि राज यांनी लग्नगाठ बांधली आहे.
नक्की वाचा: नागा चैतन्यसोबत का घेतला समंथा रुथ प्रभुने घटस्फोट? 'हे' कारण अनेकांना माहितच नाही
नागा चैतन्य याची सोशल मीडिया पोस्ट व्हायरल झाली.
समांथा रूथ प्रभू हिने राज निदीमोरू याच्याशी लग्न केल्यानंतर नागा चैतन्यची प्रतिक्रिया काय असेल याबद्दलची अनेकांना उत्सुकता होती. नागा चैतन्यने त्याच्या धुता या सिरीजमधील एक फोटो शेअर केला असून अभिनेता म्हणून तुम्ही चांगलं काम केलं तर ते लोकांना आवडतं आणि लोकांनी केलेलं कौतुक तुम्हाला आणखी बळ देतं अशा आशयाची एक पोस्ट केली आहे.
राज निदीमोरूचंही दुसरं लग्न
समांथाप्रमाणेच तिचा नवरा राज निदीमोरू याचं दुसरं लग्न आहे. श्यामली डे हिच्याशी त्याचं पहिलं लग्न झालं होतं. राज आणि समांथाच्या लग्नाच्या एक दिवस आधी श्यामलीने एक पोस्ट केली होती. तिने म्हटलं होतं की, "उतावळी लोकं उतावळ्या गोष्टी करत असतात." तिच्या या पोस्टचा संबंध राज आणि समांथाशी नंतर जोडण्याचा काहींनी प्रयत्न केला. राज आणि समांथा The Family Man 2 च्या निमित्ताने एकत्र आले होते. तेव्हापासूनच या दोघांमध्ये प्रेमांकुर फुलल्याचे बोलले जाते.
नक्की वाचा:समांथा रूथ प्रभू आणि राज निदिमोरूचे नेटवर्थ किती, कोण आहे जास्त श्रीमंत?