Samantha Ruth Prabhu And Naga Chaitanya Divorce Reason : सुपरस्टार अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि तिचा प्रियकर राज निदिमोरूच्या लग्नाच्या जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. या कपलचे सुंदर फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले असून फिल्म इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी त्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत. अशातच अनेकांनी तिच्या पहिल्या लग्नाच्या आठवणींनाही उजाळा दिला आहे. समंथाचं पहिलं लग्न अभिनेता नाग चैतन्यसोबत झालं होतं. पण काही काळानंतर त्यांच्यात घटस्फोट झाला. त्यानंतर समंथाने 200 कोटींची पोटगीही नाकारली होती. चाहत्यांनी समंथाच्या या निर्णयाचं स्वागतही केलं होतं. परंतु, समंथा आणि नागा चैतन्य यांच्यात घटस्फोट होण्याची नेमकी कारणे काय होती? याबाबत अनेकांना माहितच नाही. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
200 कोटींच्या पोटगीची चर्चा रंगली अन् संमथाने..
दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य आणि समंथा रुथ प्रभू हे एकमेकांपासून वेगळे होऊन 4 वर्षे झाली आहेत. त्यांच्या घटस्फोटाच्या प्रकरणात 200 कोटींच्या पोटगीची चर्चा रंगली होती.पण समंथाने यावर स्पष्टीकरण देत म्हटलं होतं की,200 कोटींच्या पोटगीचा दावा पूर्णपणे निराधर होता.
स्वतः नागा चैतन्यने 200 कोटींच्या एलिमनीच्या दाव्याला नाकारलं होतं.त्याने एका मुलाखतीत म्हटलं होतं की,आम्हाला आमच्या मार्गाने जायचे होते.वैयक्तिक कारणांमुळे आम्ही हा निर्णय घेतला होता आणि आम्हा एकमेकांचा आदर करतो.
नक्की वाचा >> नवी मुंबईतील 'या' भागात सुरु होता वेश्या व्यवसाय! पोलिसांनी स्पा सेंटरवर धाड टाकली अन् घडलं..
सामंथा घटस्फोटाबद्दल काय म्हणाली होती?
‘कॉफी विथ करण'मध्ये सामंथा रुथ प्रभूने एकदा थेट या अफवांवर बोलताना म्हटलं होतं की,मी 200 कोटींची पोटगी स्वीकारली, अशी चर्चा होती. प्रत्येक सकाळी मी आयकर अधिकाऱ्यांची वाट पाहत होते, जणेकरून ती येतील आणि सत्य समोर आणतील.पोटगीबद्दल उलट सुलट चर्चा सुरु होत्या.पण मी कोणाकडूनही एक पैसाही घेतला नव्हता. दरम्यान,नागा चैतन्य आणि सामंथा प्रभू यांनी 2017 मध्ये लग्न केलं होतं आणि 2011 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता. समंथापासून घटस्फोटानंतर नागा चैतन्यने 2024 मध्ये शोभिता धुलिपालाशी दुसरे लग्न केले.
नक्की वाचा >> श्रेयस अय्यर की धनुष? मृणाल ठाकूर कोणाला डेट करतेय? अभिनेत्रीने दिला चाहत्यांना धक्का
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world