चला हवा येवू द्या या झी मराठी वरील मालिकेत डॉ. निलेश साबळे दिसणार नाहीत. हा बातमी बाहेर आल्यानंतर त्यावर अनेक तर्क लावण्यात आले. चर्चा ही झाल्या. मात्र राशीचक्रवार शरद उपाध्ये यांनी लिहीलेल्या एका पोस्टमुळे ही चर्चा एका वेगळ्याच वळणावर गेली. निलेश साबळे यांच्या डोक्यात हवा गेली होती. आपल्या चला हवा येवू द्याच्या सेटवर अपमान झाला होता. असा आरोपही त्यांनी या पोस्टमधून केला. निलेश साबळेंना झी मराठीने डच्चू दिला असं ही त्यांनी लिहील. त्यामुळे नक्की काय झालं याची ही चर्चा रंगू लागली. त्यावर आता स्वत: निलेश साबळे यांनी पुर्णविराम दिला आहे. शिवाय काय काय झालं हे ही त्यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातू सोशल मीडियावर सांगितलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शरद उपाध्ये यांच्या आरोपना निलेश साबळे यांनी त्याच पद्धतीने उत्तर दिले आहे. उपाध्ये यांनी साबळे यांना डच्चू दिला असं म्हटलं होतं. त्याला उत्तर देताना त्यांनी सांगितलं की ही माहिती त्यांना कुणी दिली. काही बोलण्या आधी त्यांना माहिती घेणं गरजेचं होतं असं ते म्हणाले. शिवाय चला हवा येवू द्या साठी आपल्याला वेळोवेळी संपर्क करण्यात आला होता. झीच्या प्रमुखां बरोबरही आपली बैठक झाली होती. त्यात आपण आपली अडचण त्यांना सांगितली होती. सध्या आपण एका सिनेमाचं काम करत आहे. त्यात आपण जास्त व्यस्त आहोत. पुढील दिड महिना त्या सिनेमाचं काम चालणार आहे.
अशा वेळी चला हवा येवू द्या साठी तारखा देणं अवघड झाले होते. त्यामुळे आपण स्वत:हून त्या कार्यक्रमातून माघार घेण्याची विनंती केली होती. याचा अर्थ असा नव्हता की मला तो कार्यक्रम करायचाच नव्हता. किंवा आपण स्पष्टपणे नकार दिला होता. आपल्या अडचणीमुळे त्या कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. शिवाय याच चित्रपटात भाऊ कदम ही आहेत. त्यामुळे ते ही चला हवा येवू द्या मध्ये दिसणार नाहीत असं निलेश साबळे यांनी सांगितलं.
यावेळी त्यांनी आपल्या शैलीत राशिचक्रकारांचा समाचार ही घेतला. खरंतर त्यांचा फोन नंबर माझ्याकडे आहे. माझाही त्यांच्याकडे आहे. पण, ते सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून व्यक्त झाले. त्यामुळे आपल्याला ही व्यक्त व्हावं लागत आहे असं त्यांनी सांगितलं. मला डच्चू दिला असं त्यांनी वक्तव्य केलं. त्याव मला एवढंच बोलायचंय आहे की तुम्हाला यातील पूर्ण माहिती आहे का? खरंतर, तुमच्यासारख्या मोठ्या व्यक्तीने ही पोस्ट लिहिताना थोडी माहिती घ्यायला हवी होती. तुम्हाला सगळेजण गुरू म्हणून फॉलो करतात. खरंतर ‘झी मराठी'मध्ये तुमचीही ओळख आहे. तुम्ही एक फोन करून विचारू शकला असता की नेमकं काय झालंय? निलेश साबळे या कार्यक्रमात का नाही? तुम्हाला त्याची सर्व माहिती मिळाली असती असंही त्यांनी या व्हिडीओमध्ये स्पष्ट केलं.