- नोरा फतेही यूट्यूबवर ४५ लाखाहून अधिक सब्सक्राइबर्ससह सर्वाधिक लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री ठरली आहे
- शिल्पा शेट्टी कुंद्रा यांचे यूट्यूबवर ३८ लाख सब्सक्राइबर्स असून त्या या यादीत दुसऱ्या स्थानावर आहेत
- आलिया भट्ट यांचे २६ लाख सब्सक्राइबर्स असून ती या यादीतील तिसऱ्या क्रमांकावर आहे
Bollywood News: सध्याच्या डिजिटल युगात बॉलिवूड सेलिब्रिटी केवळ रुपेरी पडद्यापुरते मर्यादित राहिलेले नाहीत. इन्स्टाग्रामवर सक्रिय असणारे हे स्टार्स आता लॉंग व्हिडिओ आणि व्लॉगिंगसाठी यूट्यूबचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत. नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीनुसार, यूट्यूबवर सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या टॉप 7 सेलिब्रिटींची यादी समोर आली आहे. यामध्ये एका विदेशी अभिनेत्रीने अव्वल स्थान पटकावले आहे. त्यात तिने आलिया पासून अगदी माधुरी दिक्षित पर्यंत सर्वांनाच मागे सोडले आहे.
बॉलीवूडची प्रसिद्ध डान्सर आणि अभिनेत्री नोरा फतेही हिने आलिया भट्ट, शिल्पा शेट्टी आणि माधुरी दीक्षित यांसारख्या आघाडीच्या अभिनेत्रींना मागे टाकत, यूट्यूबवर पहिले स्थान मिळवले आहे. नोराच्या यूट्यूब चॅनेलवर 45 लाख म्हणजेच 4.5 मिलियनहून अधिक सब्सक्राइबर्स आहेत. बॉलिवूडमध्ये सर्वाधिक सब्सक्राईबर्स मिळालेली ती पहिली अभिनेत्री ठरली आहे. या यादीत दुसऱ्या स्थानावर योगा क्वीन शिल्पा शेट्टी कुंद्रा आहे. तिचे 38 लाख सब्सक्राइबर्स आहेत. तर तरुणांची लाडकी अभिनेत्री आलिया भट्ट 26 लाख सब्सक्राइबर्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
या यादीत चौथ्या क्रमांकावर क्रिती सेनॉन आहे. तिचे जवळपास 13.3 लाख सब्सक्राइबर्स आहेत. तर पाचव्या क्रमांकावर धकधक गर्ल म्हणून ओळख असलेली माधुरी दीक्षित आहेत. तिचे जवळपास 13.1 लाख सब्सक्राइबर्स आहेत. विशेष म्हणजे, या संपूर्ण यादीत कार्तिक आर्यन हा एकमेव पुरुष अभिनेता आहे. त्याच 8.3 लाख सब्सक्राइबर्स आहे. तो या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. तर अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस 8.26 लाख सब्सक्राइबर्ससह सातव्या स्थानावर आहे.
सेलिब्रेटींचा नवा अड्डा म्हणून यूट्यूबकडे पाहीले जाते. बॉलिवूड स्टार्सच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. आता हे स्टार्स स्वतः व्लॉग आणि पॉडकास्टच्या माध्यमातून चाहत्यांच्या थेट संपर्कात येत आहेत. यूट्यूबवर सध्या बॉलिवूडच्या अनेक बड्या स्टार्सचा बोलबाला आहे. पण या मध्ये कॅनेडियन वंशाची अभिनेत्री नोरा फतेही हीने बाजी मारल्याचे दिसून येत आहे. तिने बॉलिवूडच्या दिग्गजांना मागे टाकले आहे हे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.