​ओसामा बिन लादेन होता 'या' भारतीय गायिकेचा फॅन! रोज ऐकायचा 3 गाणी, ती गायिका माहित आहे का?

त्यांनी या निमित्ताने संगीत विश्वातील अंतर्गत राजकारणावरही परखड मत मांडले

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • ओसामा बिन लादेन जवळ अलका याग्निक यांच्या गाण्यांच्या ऑडिओ कॅसेट्स सापडल्या होत्या
  • अलका याग्निक यांनी ओसामाच्या गाण्यांच्या आवडीबाबत सहजपणे आणि मिश्कीलपणे आपली प्रतिक्रिया दिली
  • ओसामाला माझी गाणी आवडत होती याच माझा दोष काय असं ही त्या म्हणाल्या.
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

मोस्ट वाँटेड दहशतवादी ओसामा बिन लादेन आज या जगात नाही. पण त्याच्याशी निगडीत गोष्टींची चर्चा आज ही होते. अशीच एक गोष्टी थेट भारताशी संबंधीत आहे. ओसामाला म्यूझिक आवडत होते. खास करून तो भारतीय म्युझिक ऐकायचा. तो एका भारतीय गायिकेचा फॅन ही होता. त्याच्याकडे तिच्या गाण्याच्या सीडी ही सापडल्या होत्या. त्या गायिकेने त्याच्या मृत्यूनंतर याबाबत आपली प्रतिक्रीया दिली आहे.  चित्रपट निर्माती अनू रंजन यांच्या ‘रील ऑर रिअल विथ अनू' या टॉक शोमध्ये त्यांनी याचा खुलासा केला आहे.  

बॉलिवूडच्या दिग्गज गायिका अलका याग्निक यांनी या शो मध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीत त्यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीतील अनेक रंजक आणि धक्कादायक किस्से सांगितले आहेत. याच वेळी  म्यूझिक इंडस्ट्रीतील  राजकारण, करिअरमधील चढ-उतार यावर ही भाष्य केलं आहे. मात्र सर्वात वेगळं आणि सर्वांनाच चकीत करणारं वक्तव्य ही त्यांनी याच मुलाखतीत केलं आहे. त्यांनी जगातील मोस्ट वाँटेड दहशतवादी ओसामा बिन लादेन याच्याशी जोडल्या गेलेल्या एका जुन्या आणि वादग्रस्त दाव्यावर जाहीर भाष्य केले आहे.

Advertisement

नक्की वाचा - TV Serial: TVवरील सर्वात छोटी मालिका माहितेय का? फक्त 13 भागात संपली कथा, तरीही प्रेक्षकांना लावलेलं वेड

​काही वर्षांपूर्वी अमेरिकन सैन्याने ओसामा बिन लादेनच्या पाकिस्तानातील अबोटाबाद येथील अड्ड्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात ओसामा मारला गेला. त्यामुळे ओसमाच्या ठिकाण्यावरून अलका याग्निक यांच्या गाण्यांच्या ऑडिओ कॅसेट्स सापडल्याची बातमी समोर आली होती. याबाबत अलका याग्निक यांनी अत्यंत सहज पण तेवढ्याच मिश्कीलपणे उत्तर दिले. त्या म्हणाल्या, त्यात माझी काय चूक आहे? जर कोणाला माझी गाणी आवडत असतील, तर ते चांगलेच आहे ना!, त्या पुढे म्हणाल्या की ओसामाच्या आत कुठेतरी एक कलाकार लपला असेल, ज्याला संगीताची आवड होती. संगीत हे कोणालाही आकर्षित करू शकते. असं ही त्या म्हणाल्या.

नक्की वाचा - Rajesh Sharma: शूटिंग संपले अन् घात झाला! दाट झाडीत गप्पा मारताना काय घडलं? प्रसिद्ध अभिनेत्याची मृत्यूशी झुंज

​या मुलाखतीत अलका याग्निक यांनी संगीत विश्वातील अंतर्गत राजकारणावरही परखड मत मांडले. बॉलिवूडमध्ये नेहमीच गटबाजी आणि लॉबिंग चालते, अशी कबुली त्यांनी दिली. अनेकदा उत्तम गाणी हाताशी आलेली असतानाही केवळ या राजकारणामुळे ती दुसऱ्या गायकांकडे वर्ग करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, आपल्याला याचा कधीही पश्चात्ताप झाला नाही, असे  त्या म्हणाल्या. नशिबात जे असते तेच मिळते. इंडस्ट्रीत टिकून राहण्यासाठी प्रतिभेसोबतच संयम आणि सकारात्मकता महत्त्वाची असते, असा सल्ला त्यांनी नवीन कलाकारांना दिला.
 

Advertisement