
मुंबई: मराठी चित्रपट प्रेमींसाठी एक सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. मराठी चित्रपट प्रेमींना वेगवेगळ्या विषयांवरील गाजलेले 41 मराठी चित्रपट मोफत पाहता येणार आहे. मुंबईच्या पु. ल. देशपांडे महाराष्ट्र अकादमीकडून येत्या 21 ते 24 एप्रिल रोजी मराठी चित्रपट महोत्सव 2025चे आयोजन करण्यात आले आहे. जाणून घ्या सविस्तर...
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की,मुंबईच्या पु. ल. देशपांडे महाराष्ट्र अकादमीकडून चित्रपताका या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 21 एप्रिल रोजी या महोत्सवाचे उद्घाटन होणार असून 24 एप्रिल पर्यंत हे महोत्सव सुरु राहील. यामध्ये बापल्योक, जून फर्निचर, कुलूप, पावनखिंड यांसारखे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ आणि पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय दर्जाचा ‘चित्रपताका' मराठी चित्रपट महोत्सव येत्या २१ ते २४ एप्रिल रोजी पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे होत आहे. या महोत्सवात दर्जेदार 41 मराठी चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. आज या महोत्सवाच्या वेळापत्रकाची घोषणा केली.

या चित्रपताका महोत्सवात पाणी प्रश्नावर भाष्य करणारा पाणी, येरे येरे पावसा, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आधारित तेरव, स्त्री जीवनावर आधारित बाई पण भारी देवा, तिचं शहर होण, बटरफ्लाय, पिता-पुत्राच्या भावनिक सबंधांवर आधारलेला बापल्योक, जून फर्निचर, कुलूप, ग्रामीण जीवनावर आधारित गाभ, ग्लोबल आडगाव, पळशीची पिटी, भेरा, ऐतिहासिक पावनखिड, सामाजिक मदार, रोंदल, या गोष्टीला नाव नाही, जयंती, मराठी भाषेचा अभिमान जागृत करणारा इंटरनॅशनल फॅलोमफोक, स्वातंत्रसंग्रामवर आधारित शहीद भाई कोतवाल, या विषयासह मी वसंतराव, कारखानीसांची वारी, वाळवी या चित्रपटांचे प्रदर्शन यावेळी होणार आहे. तसेच, परिसंवाद, चर्चासत्र व मुलाखतींचेही नियोजन करण्यात आले आहे.. अशी माहिती आशिष शेलार यांनी दिली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world