Jaideep Ahlawat: 'पाताल लोक'मधील हाथीराम झाला मुंबईकर! अंधेरीत घेतलं ड्रीम होम, किंमत वाचून डोळे फिरतील

Actor Jaideep Ahlawat New Home: व्यवहाराच्या नोंदणीमध्ये 60 लाख रुपये स्टॅम्प ड्युटी शुल्क आणि 30,000 रुपये अतिरिक्त नोंदणी शुल्क समाविष्ट होते.

जाहिरात
Read Time: 2 mins

मुंबई: ओटीटी प्लॅटफॉर्मवरील पाताल लोक ही वेबसिरीज प्रचंड गाजली. या सिरीजमध्ये हाथीरामची भूमिका साकारणारा अभिनेता जयदीप अहलावतचे सर्वत्र कौतुक झाले. हाथीरामची भूमिका साकारुन वेबसिरीजच्या जगतात लोकप्रियता मिळवलेल्या जयदीप अहलावत आता मुंबईकर झाला असून त्याने अंधेरीमध्ये आलिशान फ्लॅट खरेदी केला असून त्याची किंमत ऐकून तुमचेही डोळे फिरतील.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मीडिया रिपोर्टनुसार, मूळचा हरियाणाचा असलेला , अभिनेता जयदीप अहलावत आणि त्याची पत्नी ज्योती हुडा यांनी मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात एक आलिशान अपार्टमेंट खरेदी केले आहे. मे 2025मध्ये  या कराराची अधिकृत नोंदणी झाली आहे. जयदीप अहलावतने या स्वप्नातल्या घरासाठी तब्बल 10 कोटी इतकी किंमत मोजली आहे. 

Advertisement

हे आलिशान घर अंधेरी पश्चिम भागातील 'पूर्णा अपार्टमेंट' या निवासी प्रकल्पात आहे. त्याचा कार्पेट एरिया 1,950 चौरस फूट आणि बिल्ट-अप एरिया 217.47 चौरस मीटर आहे. त्यात 4 कार पार्किंग एरिया देखील समाविष्ट आहे. व्यवहाराच्या नोंदणीमध्ये 60 लाख रुपये स्टॅम्प ड्युटी शुल्क आणि 30,000 रुपये अतिरिक्त नोंदणी शुल्क समाविष्ट होते.

( नक्की वाचा :  'कुछ कुछ होता है'मधील अंजलीचा फोटो व्हायरल, 27 वर्षानंतरचा लुक पाहून बसणार नाही विश्वास )

अभिनेता जयदीप अहलावत ने ज्या भागात अपार्टमेंट खरेदी केले आहे त्या भागातील खासियत म्हणजे ते वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, लिंक रोड आणि एसव्ही रोडसह अनेक मुख्य रस्त्यांनी जोडलेले आहे. येथे वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो लाईनची सुविधा देखील आहे.

दरम्यान,  जयदीप अहलावतच्या सिनेविश्वातील कारकिर्दीवर बोलायचे झाले तर सैफ अली खानसोबत नेटफ्लिक्स चित्रपट 'ज्वेल थीफ' मध्ये दिसला होता. तो 'रईस', 'राजी', 'पाताल लोक', 'महाराज', 'जाने जान', 'संदीप और पिंकी फरार', 'अजीब दास्तान', 'थ्री ऑफ अस', 'अ‍ॅन अॅक्शन हिरो', 'कमांडो: अ वन मॅन आर्मी', 'गँग्स ऑफ वासेपूर' आणि इतर चित्रपटांमध्ये त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखला जातो.

अमिताभ बच्चननं 'या' कारणासाठी केलं जयाशी लग्न... अन्यथा नसते आज पती-पत्नी