Phule Movie : ब्राम्हण महासंघाचा आक्षेप, महात्मा फुलेंच्या जयंती दिनी होणारं चित्रपटाचं प्रदर्शन लांबणीवर

छावा चित्रपटानंतर आता आणखी एक चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची भीती आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Phule Movie : सध्या ऐतिहासिक त्यातही महापुरुषांच्या जीवनावर आधारित चित्रपटांचं पेव फुटलं आहे. त्यातून अनेक वाद उद्भवतात. धक्कादायक म्हणजे राजकारणीही देशाच्या विकासापेक्षा ऐतिहासिक चित्रपटाच्या आधारावर विविध वादग्रस्त विषय उकरून काढतात. छावा चित्रपटानंतर आता आणखी एक चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची भीती आहे. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित 'फुले' हा चित्रपट येत्या 11 एप्रिलला प्रदर्शित होणार होता. विशेष म्हणजे याच दिवशी महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती आहे. मात्र ब्राम्हण महासंघाने आक्षेप घेतल्यानंतर या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काय आहे आक्षेप?


ब्राम्हण महासंघाच्या वतीनं या फुले चित्रपटाच्या ट्रेलरवर आक्षेप घेण्यात आला आहेत. या ट्रेलरमध्ये एक ब्राम्हण मुलगा सावित्रीबाईंच्या अंगावर शेण फेकताना दाखवलं आहे. हा प्रकार दाखवण्यास विरोध नाही. मात्र फुलेंच्या शाळेसाठी मदत करणारे ब्राम्हणच होते. ते ट्रेलरमध्ये का दाखवण्यात आले नाही. असा सवाल ब्राम्हण महासंघाचे आनंद दवे यांनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा जातीयवाद पसरवण्यात येत असल्याचा आरोप करत आनंद दवे यांनी या सिनेमावर आक्षेप घेतलाय.

Advertisement

Advertisement

नक्की वाचा - Solar Village: 'या' गावातल्या लोकांना येतं शून्य रुपये लाईट बील, काय आहे कारण?


चित्रपटाबद्दल...


महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित 'फुले' या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. अनंद महादेवन यांनी हा चित्रपट प्रदर्शित केला आहे. यामध्ये महात्मा ज्योतिबांची भूमिका अभिनेता प्रतीक गांधी तर सावित्रीबाईंची भूमिका अभिनेत्री पत्रलेखा राव यांनी साकारली आहे. प्रणय चोक्शी, जगदीश पटेल, रितेश कुडेचा, अनुया चौहान कुडेचा, सुनील जैन आणि डॉ. राज खवारे यांनी फुले चित्रपटाची निर्मिती केली आहे.

Advertisement