Phullwanti Title Track | Prajaktta Mali : बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित फुलवंती सिनेमाचे टायटल ट्रॅक रिलीज करण्यात आले आहे. 'पुनवेच्या तारांगणी शुक्राची मी चांदणी लखलखत्या तेजाची, झगमगत्या रूपाची.... रंभा जणू मी देखणी”...असे म्हणत आपल्या मनमोहक अदाकारीने आणि नृत्याने सर्वांना भुरळ पाडायला ‘फुलवंती'च्या रूपामध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळी सर्वांसमोर येण्यासाठी सज्ज झाली आहे. 11 ऑक्टोबरला फुलवंती सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकणार आहे.
(नक्की वाचा: प्राजक्ताचा फुलवंती या तारखेला होणार रिलीज, बाबासाहेब पुरंदरेंच्या कादंबरीची कथा झळकणार मोठ्या पडद्यावर)
‘फुलवंती' चे अस्मानी सौंदर्य
पेशवाईत लोककला आणि लोककलावंत यांना मोठा राजश्रय मिळत असे, याच काळात ‘फुलवंती' आपली कला सादर करण्यासाठी मुघल दरबारात हजर झाली. ‘फुलवंती' चे अस्मानी सौंदर्य आणि आणि मनमोहक नृत्यकला याचे दर्शन आपल्याला ‘फुलवंती' या टायटल ट्रॅकमधून होणार आहे.
गीतकार वैभव जोशी, विश्वजित जोशी आणि स्नेहल तरडे यांच्या लेखणीतून साकारलेले हे गीत गायिका आर्या आंबेकरने गायले आहे. गीतकार जोडी अविनाश-विश्वजीत यांनी हे गाणे संगीतबद्ध केले आहे तसेच उमेश जाधव यांचे नृत्य दिग्दर्शन आणि प्राजक्ता माळीची ‘फुलवंती'च्या रूपातील अदाकारी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
(नक्की वाचा: Like and subscribe Movie: अमेय वाघसोबत गौतमी पाटील थिरकणार आणि संपूर्ण महाराष्ट्रावर लिंबू फिरवणार)
पखवाज आणि घुंगरांची जुगलबंदी
‘फुलवंती' हा संगीतप्रधान ऐतिहासिक चित्रपट असून या यामध्सये र्वात महत्त्वाची भूमिका होती ती म्हणजे संगीत दिग्दर्शकांची. म्हणूनच ‘फुलवंती'विषयी अविनाश-विश्वजित यांनी म्हटलेय की, ‘फुलवंती'च्या गाण्यांमध्ये असणारी भव्यता, नजाकत, तो काळ आणि सुमधुर संगीत यांचा मेळ साधणं हे एक मोठं आव्हान होतं. त्यासाठी केलेली मेहनत आजपासून प्रेक्षक अनुभवणार आहेत; याची खूप उत्सुकता आहे. तसेच ही पखवाज आणि घुंगरांची जुगलबंदी प्रेक्षकांना नक्की आवडेल याची आम्हाला खात्री आहे.
(नक्की वाचा: चित्रपटाच्या पोस्टरवर झळकले राज ठाकरे, शिवसेनेच्या दसरा मेळाव्यापूर्वी प्रदर्शित होणार चित्रपट)
‘फुलवंती'..शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेली अलौकिक कलाकृती चित्रपटरुपात आपल्यासमोर अवतरणार आहे. सिनेमाचे संवाद लेखन प्रविण विठ्ठल तरडे यांचे आहे तर दिग्दर्शन स्नेहल प्रविण तरडे करत आहेत. सिनेमाच्या छायाचित्रणाची जबाबदारी महेश लिमये यांनी सांभाळली आहे. कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मंगेश पवार, श्वेता माळी, प्राजक्ता माळी चित्रपटाचे निर्माते आहेत.