Salman Khan: 24 तासांत दुसरी पोस्ट अन् थेट ऑफर! पेपर लीक आंदोलनावर सलमानचा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला

Salman Khan : पेपर लीक प्रकरणावरून पेटलेल्या आंदोलनात आता बॉलिवूड अभिनेता सलमान खाननं नवं आवाहन केलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Salman Khan : सलमान खाननं 24 तासांमध्ये दुसरं ट्विट केलं आहे.
मुंबई:

Salman Khan paper leak protest statement: पेपर लीक प्रकरणावरून पेटलेल्या आंदोलनात आता बॉलिवूड अभिनेता सलमान खाननं नवं आवाहन केलं आहे. विद्यार्थ्यांना पाठिंबा दिल्यानंतर अवघ्या 24 तासांच्या आत सलमानने पुन्हा एकदा पोस्ट करत प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना आपले उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले आहे. इतकेच नाही तर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही घरी परतण्याचे आवाहन करत सलमानने वांगचुक यांना थेट घरून जेवण पाठवण्याची तयारी दर्शवली आहे.

सोनम, आता बस झालं! 

लडाखमधील सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे पेपर लीक प्रकरणाविरोधात आणि शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांसाठी 28 जूनपासून अन्नत्याग उपोषणाला बसले आहेत. यावर भाष्य करताना सलमानने म्हटले आहे की, सोनम आता खूप झाले, हे आंदोलन आणखी वाढवू नका. गरज पडल्यास ही ऊर्जेची साथ दुसऱ्या दिवशीसाठी राखून ठेवा आणि आधी काहीतरी खाऊन घ्या. तुमची इच्छा असेल तर मी माझ्या घरून तुमच्यासाठी जेवण पाठवून देतो.

Advertisement

( नक्की वाचा : BMC News: 'भारत तेरे तुकडे होंगे...'ची घोषणा थेट मुंबई महापालिकेत? महापौरांच्या गंभीर आरोपानं नवं वादळ )
 

आता विद्यार्थ्यांनी घरी परतावे

पेपर लीक प्रकरणाची दखल खुद्द देशाच्या प्रधांनमंत्र्यांनी घेतली असल्याचे सांगत सलमान खानने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले आहे. देशातील विद्यार्थी आणि त्यांची सुरक्षा ही आपल्या सर्वांसाठी प्रथम प्राथमिकता आहे. माननीय पंतप्रधानांनी या मुद्द्यावर ट्विट केले असून पेपर लीकसाठी जबाबदार असणाऱ्यांवर ते कठोर कारवाई करतील असा मला पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आता कोणतीही चिंता न करता आपल्या पालकांकडे सुरक्षित घरी परतावे, असे आवाहन सलमानने केले आहे.

राजकीय फायद्यासाठी आंदोलनाचा वापर नको

या आंदोलनाला राजकीय वळण मिळू नये असा इशाराही सलमानने आधीच दिला होता. हा मुद्दा केवळ विद्यार्थी आणि शिक्षण व्यवस्थेशी संबंधित असून त्याचे श्रेय पूर्णपणे विद्यार्थ्यांनाच मिळाले पाहिजे. आंदोलनाला हिंसक वळण लागल्याबद्दल चिंता व्यक्त करत सलमानने जखमी विद्यार्थ्यांबद्दल सहवेदना व्यक्त केल्या होत्या. 

या आंदोलनाला ओमी वैद्य, झीनत अमान, नसीरुद्दीन शाह, रत्ना पाठक शाह, अभय देओल, सोनाक्षी सिन्हा आणि रितेश देशमुख यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनीही पाठिंबा दर्शवला आहे.


Topics mentioned in this article