तुमच्या टेन्शनवरची मात्रा, प्रेक्षकांना खळाळून हसवतात हे विनोदी कार्यक्रम

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

रोज दिवसभराच्या धावपळीत विरंगुळा म्हणून अनेकजण संध्याकाळी टीव्ही पाहातात. प्रेक्षकांची ही आवड लक्षात घेऊनच विनोदी कार्यक्रम वेगवेगळ्या वाहिनींवर दाखवण्यात येतात. तीन दशकांपूर्वी फक्त दूरदर्शनची मक्तेदारी होती त्यावेळी देखील विनोदी मालिका बघणाऱ्या प्रेक्षकांची संख्या मोठी होती. आता वेगवेगळ्या खासगी वाहिन्यांच्या काळात कार्यक्रमांनी आपलं स्वरुप बदललंय. विनोदी मालिकांसोबतच 'कॉमेडी रिअ‍ॅलिटी शो' आता सुरु झाले आहेत. हिंदीमध्ये हा प्रयोग पहिल्यांदा सुरु झाला. त्यानंतर मराठीमध्येही हा प्रयोग आता स्थिरावलाय. 'तुमच्या टेन्शनवरची मात्रा' असलेले कोणकोणते कॉमेडी शो सध्या छोटा पडदा गाजवतायत ते पाहूया

फू बाई फू

'झी मराठी' वरील हा लोकप्रिय 'कॉमेडी रिअ‍ॅलिटी शो'आहे. ज्येष्ठ अभिनेत्री अभिनेत्री निर्मिती सावंत आणि गायक स्वप्नील बांदोडकर हे या कार्यक्रमाचे प्रशिक्षक होते. हा कार्यक्रम प्रचंड गाजला. याची चर्चा देखील सर्वत्र झाली. ही एक स्पर्धा देखील होती. ती पूर्ण झाल्यावर या कार्यक्रमानं प्रेक्षकांचा निरोप घेतला. पण लोकांच्या आग्रहामुळे दुसरे पर्व आले. सध्या हा शो सुरु नसला तरी प्रेक्षकांच्या मनात त्याचं एक खास स्थान आहे. 

कॉमेडी एक्स्प्रेस

२००८ साली 'कलर्स मराठी'वर या कार्यक्रमाला सुरुवात झाली. यामध्ये कोणतीही स्पर्धा नव्हती. प्रेक्षकांचे मनोरंज करण्यासाठी या कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली होती. 'कलर्स मराठी'वर रात्रीच्या प्राईम टाईममध्ये होणाऱ्या या कार्यक्रमात अनेक विनोदी कलाकार सहभागी झाले होते. याचाही दुसरा भाग सुरु करण्यात आला होता. 

कॉमेडीची बुलेट ट्रेन

'कॉमेडी एक्स्प्रेस'चा दुसरा भाग म्हणजे 'कॉमेडीची बुलेट ट्रेन'. या कार्यक्रमात कॉमेडी एक्स्प्रेसमधील जुन्या कालाकारांसह काही नवे चेहरे देखील होते. या कार्यक्रमानंही प्रेक्षकांचं चांगलं मनोरंजन केलं. हा कार्यक्रमही 'कलर्स मराठी' वर प्रदर्शित होत असे.

महाराष्ट्राची हास्यजत्रा

'सोनी मराठी' वाहिनीवर सर्वांचा आवडता आणि लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्रा. या कार्यक्रमाने अल्पवधीतच प्रेक्षांमध्ये आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं. 'कॉमेडी एक्स्प्रेस' आणि कॉमेडीची बुलेट ट्रेन या मालिकेच्या निर्माता-दिग्दर्शकांनीच  हा कार्यक्रम सुरु केला. आज हा पहिल्या क्रमांकावरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचे अनेक सिझन्स झाले आहेत. कोरोना लॉकडाऊनमधील खडतर कालखंडाही या मालिकेनं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. या कार्यक्रमाची आजही मोठी क्रेझ आहे.  

एक टप्पा आउट

'स्टार प्रवाह'वर हा कार्यक्रम काही काळासाठी आला होता. प्रसिद्ध विनोद कलाकार जॉनी लिव्हर या कार्यक्रमाचा भाग होते. या कार्यक्रमाला जास्त पसंती न मिळाल्याने हा कार्यक्रम काही काळाने बंद करण्यात आला.