मुलाच्या लग्नावर Raj Babbar नं सोडलं मौन! म्हणाले, 'पुरुष तर लग्न करत असतात'!

अभिनेता प्रतीक बब्बरनं ( Prateik Babbar)  त्याची गर्लफ्रेंड प्रिया बॅनर्जी (Priya Banerjee) बरोबर नुकतंच लग्न केलं.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

अभिनेता प्रतीक बब्बरनं ( Prateik Babbar)  त्याची गर्लफ्रेंड प्रिया बॅनर्जी (Priya Banerjee) बरोबर नुकतंच लग्न केलं. प्रतीकची आई आणि दिवंगत अभिनेती स्मिता पाटीलच्या (Smita Patil) मुंबईतील घरी हे लग्न झालं. 

प्रतीकनं या लग्नात वडील राज बब्बर (Raj Babbar) यांच्या कुटुंबीयांना बोलावलं नव्हतं. त्याबाबत बरीच चर्चा सुरु आहे. प्रतीकचा सावत्र भाऊ आर्या बब्बरनं ( Aarya Babbar) नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये याबाबतची प्रतिक्रिया दिली आहे. आर्यानं एका स्टँडअप कॉमेडी कार्यक्रमात बब्बर कुटुंबीयांचा एकापेक्षा जास्त लग्न करण्याच्या इतिहासाकडं लक्ष वेधलं. त्याचबरोबर या लग्नाबाबात वडिल राज बब्बर यांची प्रतिक्रिया देखील सांगितली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

'बब्बर तो शादी करते रहते है?' या शिर्षकाच्या अंतर्गत या कार्यक्रमात आर्यानं या विषयावर मजेशीरपणे प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, 'माझ्या वडिलांनी दोनदा लग्न केलं. माझ्या बहिणीनं दोन लग्न केली. आता माझ्या भावाचंही दुसऱ्यांदा लग्न झालं. अगदी माझा कुत्रा हॅप्पीच्याही दोन गर्लफ्रेंड आहेत. त्यामुळे तो दुसरं लग्न करतोय यामध्ये मला काही विशेष वाटत नाही. फक्त मी एकटाच घटस्फोटाच्या गुंतागुंतीना सामोरं जाण्याबाबत आळशी आहे.'

आर्यानं या लग्नाबाबत वडिल राज बब्बर यांची प्रतिक्रिया सांगितली आहे. माझ्या भावानं आपल्याला लग्नाला का बोलावलं नाही? असं मीडियानं विचारले तर मी काय उत्तर देऊ असं वडिलांना विचारलं. त्यावर त्यांना सांग, पुरुष तर लग्न करत असतात,' असं वडिलांनी सांगितल्याचा खुलासा आर्यानं केला. 

Advertisement

( नक्की वाचा :  Samantha Ruth Prabhu : 'या' 2 चुकांमुळे तुटलं समांथाचं घर? व्हॅलेटाईंन डे पूर्वी अभिनेत्रीची पोस्ट Viral )

'सावत्र भावासारखं वागवलं नाही'

आर्या बब्बरनं यापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये प्रतिकनं त्याच्या लग्नात वडिलांना बोलावायला हवं होतं, असं मत व्यक्त केलं होतं.  'माझी आई (नदीरा बब्बर), बहीण (जूही बब्बर) यांना न बोलवणं हे समजू शकतो. आम्ही त्याला एक कुटुंब म्हणून निराश केलं असेल. पण, आम्ही कधीही त्याच्याशी सावत्र भावासारखा व्यवहार केला नाही. पण, हरकत नाही आमच्याकडून कदाचित काही चूक झाली असेल. पण, आमचे बाबा, त्याचे बाबा (राज बब्बर) यांना तरी बोलवायला हवं होतं. तो असं कसं करु शकतो? असा प्रश्न आर्यानं विचारला होता.

प्रतीकनं असं करुन त्याची आई स्मिता पाटील यांनाही दु:खी केलं आहे. हे त्याच्या आईला समजल्यावर कसं वाटेल असा त्यानं एक क्षण तरी विचार करायला हवा होता. तो त्याच्या आईवर खूप प्रेम करतो. तिचा आदर करतो. तर तिला त्रास होईल असं तो कसं करु शकतो? ' अशी प्रतिक्रिया आर्यानं व्यक्त केली होती.
 

Advertisement
Topics mentioned in this article