जाहिरात

Samantha Ruth Prabhu : 'या' 2 चुकांमुळे तुटलं समांथाचं घर? व्हॅलेटाईंन डे पूर्वी अभिनेत्रीची पोस्ट Viral

प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) गेल्या काही दिवसापासून तिचा माजी नवरा नारा चैतन्य (Naga Chaitanya) बरोबर झालेल्या घटस्फोटामुळे चर्चेत आहे.

Samantha Ruth Prabhu : 'या' 2 चुकांमुळे तुटलं समांथाचं घर? व्हॅलेटाईंन डे पूर्वी अभिनेत्रीची पोस्ट Viral
मुंबई:

प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) गेल्या काही दिवसापासून तिचा माजी नवरा नारा चैतन्य (Naga Chaitanya) बरोबर झालेल्या घटस्फोटामुळे चर्चेत आहे. समांथानं नागाशी लग्नानंतर चार वर्षांनी घटस्फोट घेतला होता. या घटस्फोटानंतर नागानं शोभिता धुलिपालाबरोबर लग्न केलं. तर समांथा एकट्यानंच आयुष्य जगत आहे.

समांथानं घटस्फोटानंतर मानसिक शांततेवर उपचार घेतले होते. ती आजही उपचार घेत आहे. समांथा आणि नागाच्या घटस्फोटाचं खरं कारण अजून पुढं आलेलं नाही. या दोघांनीही या प्रकरणात अद्याप उघडपणे काही सांगितलेलं नाही. आता व्हॅलेंटाईन डे पूर्वी समांथानं एक इन्स्टा स्टोरी पोस्ट केलीय. तिची ती पोस्ट फॅन्सचं लक्ष वेधून घेत आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

समांथाचा घटस्फोट का झाला?

ऊ अंटावा गाण्यामुळे लोकप्रिय असलेल्या संमाथा रुथ प्रभूची ही पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये तिने रिलेशनशिपवर मत व्यक्त केलं आहे. तुम्ही जर तुमचं मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्यावर लक्ष दिलं नाही तर त्यामुळे रिलेशनशिपमध्ये मोठं नुकसान होतं, असं समांथानं सांगितलं आहे.

India's Got Latent: असभ्यतेचे सर्व रेकॉर्ड तोडणारी Apoorva Mukhija कोण आहे? ती चर्चेत का आहे?

( नक्की वाचा :  India's Got Latent: असभ्यतेचे सर्व रेकॉर्ड तोडणारी Apoorva Mukhija कोण आहे? ती चर्चेत का आहे? )

या दोन कारणांमुळे समांथाचं घर तुटलं असं तिला सांगायचं आहे का? असा या पोस्टनंतर विचारला जात आहे. समांथानं जय शेट्टीसोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये शेट्टीनं सांगितलं की, 'तुमच्याकडे अविश्वसनीय जोडीदार आणि प्रेमाच्या सामर्थ्याने पूर्णपणे भरलेले नाते असू शकते, परंतु तुम्ही तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घेऊ शकत नसाल, तर तुम्ही तुमच्या जोडीदाराला दाखवू इच्छित असलेले प्रेम व्यक्त करु शकत नाही.'

समांथाला काय झालं आहे?

या व्हिडिओमध्ये पुढं सांगितलं आहे की, व्यक्तीबद्दल सर्व काही योग्य असू शकते, परंतु तुम्ही तुमचे आरोग्य आणि मानसिक स्थिती योग्य राखली नाही म्हणून तुम्ही या व्यक्तीला गमावू शकता.' समांथा गेल्या काही दिवसांपासून मानसिक आणि शारीरिक आरोग्याचा सामना करत आहे. समांथानं मायोसिटिस या आजाराचा सामना करत आहे. त्याबाबत तिनं अनेकदा उघडपणे माहिती व्यक्त केली आहे. हा आजाराचा स्नायूंवर परिणाम होतो. समांथा आणि नागा चैतन्यचं 2017 साली लग्न झालं होतं. त्यानंतर 2021 मध्ये त्यांनी परस्पर सहमतीनं घटस्फोट घेत असल्याचं सोशल मीडियावर जाहीर केलं होतं.