दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील हिचा मुलगा प्रतिक याच्या लग्नात त्याचे वडील राज बब्बर यांच्या अनुपस्थितीमुळे कुटुंबातील वाद सर्वांसमोर आला. 14 फेब्रुवारी रोजी प्रिया बॅनर्जीसोबत प्रतिक विवाहबंधनात अडकला. स्वत:च्या लग्नात प्रतिकने वडिलांना निमंत्रणही दिलं नव्हतं. प्रतिकने आपली दिवंगत आई स्मिता पाटीलच्या घरात एका खासगी कार्यक्रमात प्रियासोबत लग्न केलं. झूमसोबत झालेल्या एका बातचीतमध्ये प्रतिकने राज बब्बर आणि त्याच्या कुटुंबीयांना आमंत्रण न देण्यामागील खरं कारण सांगितलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
प्रतिकने सांगितलं की, त्याची आई स्मिता पाटील आणि सावत्र आई नादिरा बब्बर यांच्यामध्ये आधीपासून मतभेद होते. घर आणि आपल्या लग्नाचं पावित्र्य राखण्यासाठी त्याने राज बब्बर आणि त्यांच्या कुटुंबाला लग्नात बोलावलं नाही. प्रतिकने झूमच्या मुलाखतीत सांगितलं की, माझी आई आणि माझ्या वडिलांच्या बायकोमध्ये आधीपासून वाद होता. मीडियामध्येही याबाबत बऱ्याच चर्चा होत्या. प्रतिक पुढे म्हणाला, मला असं वाटतं माझ्या वडिलांचा आणि त्यांच्या कुटुंबासोबतचं नातं तुटल्यानंतर त्या घरात त्यांनी राहणं अनैतिक होतं. मात्र आता परिस्थिती खूप बिघडली आहे.
नक्की वाचा - Marathi Serial : 'सर्वात खादाड मालिका, कधीही पाहा नुसतं खात असतात'; मराठी मालिकेवर चाहते संतापले
प्रतिक बब्बरच्या लग्नात राज बब्बर आणि त्याच्या कुटुंबाच्या अनुपस्थितीबाबत बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. यामुळे प्रतिक आणि राज बब्बर यांच्या नात्यात दुरावा असल्याचं सर्वांसमोर आलं होतं. नात्यांमधील दुराव्याबाबत प्रतिक म्हणाला, मी कोणालाही स्वीकारण्यास नकार दिलेला नाही. ही बाब माझी आई आणि तिच्या इच्छेशीसंबंधित आहे. माझे वडील आणि त्यांची पत्नी माझ्या लग्नासाठी त्या घरात येऊ शकले नाही,याचं मला वाईट वाटतंय. हे घर आईने माझ्यासाठी घेतलं होतं. ती या घरात माझ्यासोबत एकल पालकत्व स्वीकारून राहू इच्छित होती.