जाहिरात

Atharva Sudame News: अथर्व सुदामेला दणका! PMPने ठोठावला मोठा दंड; 'ते' रील पडले महागात

मुदतीत खुलासा न दिल्याने महामंडळाने त्याच्यावर दंडात्मक कारवाईचा निर्णय घेतला आहे.तसेच गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

Atharva Sudame News: अथर्व सुदामेला दणका! PMPने ठोठावला मोठा दंड; 'ते' रील पडले महागात
Atharva Sudame @Youtube

रेवती हिंगवे, पुणे:

Atharva Sudame PMPL Controversy: पुण्यातील प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामे नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे वादात अडकत असतो.  सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असलेल्या अथर्व सुदामेंच्या रिल्सने नवनवे वाद उभे राहत असतात. काही दिवसांपूर्वीच त्याने पुणे महानगर परिवहन महामंडळ म्हणजेच पीएमपीएमएलच्या बसमध्ये विना परवानगी रील शूट केल्याने तसेच कंटेटमधून महिलांचा अपमान केल्याने त्याला नोटीस पाठवण्यात आली होती. याचबाबत आता मोठी अपडेट समोर आली असून पीएमपीएलकडून अथर्व सुदामेला 50 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 

अथर्व सुदामेला दणका, PMPLकडून दंड

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसमध्ये विनापरवानगी चित्रीकरण करून सोशल मीडियावर रील प्रसारित करणे अथर्व सुदामेला चांगलेच महागात पडले आहे. पीएमपीकडून अथर्व सुदामेला ५०,००० हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. पीएमपीकडून २ जानेवारीला सुदामेला नोटीसबजावण्यात आली होती. यात सात दिवसांत लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र मुदतीत खुलासा न दिल्याने महामंडळाने त्याच्यावर दंडात्मक कारवाईचा निर्णय घेतला आहे.तसेच गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

Shraddha Kapoor Wedding: श्रद्धा कपूर होणार मोदी कुटुंबाची सून? 2026 मध्ये घेणार सात फेरे, ती पोस्ट चर्चेत

का नोटीस बजावण्यात आली होती?

अथर्व सुदामेने पीएमपी प्रशासनाच्या परवानगीशिवाय बसमध्ये त्याचे रील शूट केले होते. या रीलमध्ये त्याने पीएमपी वाहकांचा अधिकृत गणवेश, तिकीट मशीम तसेच बॅचही वापरला होता, हे सर्व बेकायदेशीर असल्याचे पीएमपीने म्हटले होते. अशा प्रकारांमुळे सेवेतील विश्वासहार्ता कमी होते, अशी भूमिका प्रशासनाने घेतली होती. त्यासोबतच या रीलमध्ये महिला वाहकांचा अपमानजक पद्धतीने चित्रण आल्याचाही ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला होता. 

कोण आहे अथर्व सुदामे?

अथर्व सुदामे हा पुण्यातील प्रसिद्ध कंटेट क्रिएटर असून त्याचे 17 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. पुण्याची संस्कृती, भाषा, रुढी- परंपरा अशा अनेक विषयांवर तो व्हिडिओ करत असतो. त्यालोबतच त्याने सण-उत्सव आणि कार्यक्रमांवर आधारित व्हिडिओ,संगीत आणि क्रिकेट व्हिडिओ यांच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवली आहे. 

VIDEO: 'दोन्ही हात वर करुन सांगतो..', रितेश देशमुखचे रविंद्र चव्हाण यांना एका वाक्यात खणखणीत उत्तर

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com