Punha Ekda Saade Maade Teen सिनेमाचा पार पडला मुहूर्त, रातोरात स्टार झालेली अभिनेत्री झळकणार?

Punha Ekda Saade Maade Teen Muhurat: 2007 साली बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातलेला 'साडे माडे तीन' सिनेमाचा सीक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Punha Ekda Saade Maade Teen Muhurat: ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, भरत जाधव आणि मकरंद अनासपुरे हे दिग्गज कलाकार पुन्हा एकदा एकत्रित प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 2007 साली बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या 'साडे माडे तीन' सिनेमाचा सीक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'पुन्हा एकदा साडे माडे तीन' असे या सिनेमाचे नाव असणार आहे. रविवारी (15 सप्टेंबर 2024) 'पुन्हा एकदा साडे माडे तीन' सिनेमाच्या चित्रिकरणाचा मुहूर्त पार पडला. 

कुरळे ब्रदर्स बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालण्याच्या तयारीत 

2007मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमातील कुरळे ब्रदर्संनी प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केले होते. या सिनेमाच्या निमित्ताने अभिनेता अंकुश चौधरीने दिग्दर्शन क्षेत्रामध्ये पदार्पण केले होते. सिनेमाची कहाणी आणि गाण्याने सिनेरसिकांना अक्षरशः वेड लावले होते. यामुळे प्रेक्षकांकडून 'साडे माडे तीन' सिनेमाला भरभरून प्रतिसाद मिळाला. आता या तिकडीची धमाल पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वीच अंकुश चौधरीने 'पुन्हा एकदा साडे माडे तीन' (Punha Ekda Sade Made Teen) सिनेमाची घोषणा केली होती. तेव्हापासून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. यानंतर रविवारी सिनेमाच्या चित्रिकरणाचा मुहूर्तही पार पडला.  

(नक्की वाचा: Phullwanti Title Track: फुलवंती सिनेमातील टायटल ट्रॅक रिलीज, प्राजक्ता माळी रंभा जणू देखणी)

स्टार अभिनेत्री सिनेमामध्ये झळकणार?

मुहूर्ताच्या कार्यक्रमास अनेक कलाकार मंडळींनी उपस्थिती दर्शवली होती. पण यावेळेस दोन चेहऱ्यांनी विशेष लक्ष वेधून घेतले. अमेय खोपकर यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि अभिनेता संकेत पाठकही दिसत आहेत. त्यामुळे हे दोन कलाकारही सिनेमामध्ये झळकणार आहेत का? जर रिंकू आणि संकेत 'पुन्हा एकदा साडे माडे तीन' सिनेमामध्ये दिसणार असतील तर त्यांची नेमकी भूमिका काय असेल? हे जाणून घेण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.  

Advertisement

(नक्की वाचा: सोशल मीडियावर Bigg Boss Boycott ट्रेंड; आर्याला घराबाहेर काढल्यामुळे चाहत्यांमध्ये संताप!)