-मयुर बोरसे, प्रतिनिधी
Radha Patil Exclusive: बिग बॉस फेम आणि प्रसिद्ध लोककलावंत राधा पाटील हिने तिच्या लावणी सादरीकरणावर होणाऱ्या अश्लीलतेच्या आरोपांना चोख उत्तर दिले आहे. 'एनडीटीव्ही मराठी मंच'च्या नारी शक्ती या विशेष कार्यक्रमामध्ये बोलताना तिने लावणीकडे पाहण्याचा प्रेक्षकांचा दृष्टिकोन कसा बदलला आहे, यावर उघडपणे भाष्य केले. "माझा संपूर्ण कार्यक्रम काही अश्लील पद्धतीचा नाही. मुळात लोकांच्या पसंतीस उतरते म्हणूनच आम्हाला कामे मिळत आहेत," असे राधा पाटील म्हणाली.
प्रेक्षकांना पूर्वीसारखी लावणी नकोय : राधा पाटील
राधाने सांगितले की, प्रेक्षकांची मानसिकता आता बदलली आहे. तिने अनेकदा साध्या आणि पारंपरिक पद्धतीने लावणी सादर करण्याचा प्रयत्न केला, पण समोरून प्रेक्षकांच्या टाळ्या किंवा 'वन्समोअर' येत नाही. आताची पब्लिक जर पारंपरिक कला एन्जॉय करत नसेल, तर मी एकटीनेच बदल का करावा, असा सवाल तिने उपस्थित केला.
(नक्की वाचा : Radha Patil News: अश्लीलतेच्या आरोपांवर राधा पाटीलचे चोख उत्तर; म्हणाली, लोकांना जे आवडतेय तेच मी...)
राधा पाटीलने मैत्रीण हिंदवी पाटीलचे दिले उदाहरण
आपली जवळची मैत्रीण आणि लावणी कलाकार हिंदवी पाटील हिचे उदाहरण देत राधा म्हणाली, "हिंदवी ही लावणी करताना कधी पदर देखील खाली करत नाही. ती उत्तम कलाकार आहे, पण आज तिला फार कमी कार्यक्रम मिळतात." राधाने स्पष्ट केले की तिचा संपूर्ण शो लावणीचा नसतो, ती केवळ चार लावण्या करते आणि उर्वरित वेळ मॅशअप गाण्यांवर डान्स सादर करते. शेवटी, "लोकांना जे आवडते तेच आम्ही करणार, कारण प्रेक्षकांनीच या गोष्टी डोक्यावर घेतल्या आहेत," असे सांगत तिने वादावर पडदा टाकला.
राधा पाटील NDTV मराठी 'मंच'वर LIVE | NDTV Marathi Manch LIVE | Marathi News