Raja Shivaji Collection: 'राजा शिवाजी'ची पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक कमाई, सैराटलाही टाकलं मागे

Raja Shivaji Collection: महाराष्ट्र दिनी प्रदर्शित झालेल्या 'राजा शिवाजी' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 11.35 कोटी रुपयांची विक्रमी कमाई केली

जाहिरात
Read Time: 2 mins

Raja Shivaji Box Office Collection Day 1: रितेश देशमुखची मुख्य भूमिका आणि दिग्दर्शन असलेल्या 'राजा शिवाजी' या ऐतिहासिक चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास रचला आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 11 कोटींहून अधिक गल्ला जमवत मराठी चित्रपटसृष्टीला नवा 'सुपरहिट' दिला आहे.

पहिल्या दिवसाचे कमाईचे आकडे 

चित्रपटाने केवळ मराठी भाषेतूनच नव्हे, तर हिंदीतूनही चांगली कमाई केली आहे.

  • एकूण कमाई: 11.35 कोटी रुपये (सर्व भाषा)
  • मराठी व्हर्जन: सुमारे 8 कोटी रुपये.
  • हिंदी व्हर्जन: सुमारे 3.35 कोटी रुपये.
  • महाराष्ट्रात 1941 शोमधून सरासरी 68% ऑक्युपन्सी नोंदवण्यात आली आहे.

'सैराट'चा विक्रम मोडीत 

'राजा शिवाजी'ने मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक जुने रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. मराठी सिनेमाच्या 8 कोटींच्या कमाईसह हा चित्रपट पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट ठरला आहे. प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाने 5.14 कोटी रुपयांचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग केले होते, ज्यापैकी 3.60 कोटी निव्वळ उत्पन्न केवळ मराठी व्हर्जनमधून मिळाले होते. या चित्रपटाने 'सैराट' (Sairat) आणि 'टाइमपास 2' (Timepass 2) या चित्रपटांचा 3.60 कोटींचा पहिल्या दिवसाचा विक्रम सहज पार केला आहे.

हिंदी भाषेचा मोठा आधार

सुरुवातीच्या कलानुसार, चित्रपटाला 10 कोटींचा टप्पा पार करण्यासाठी हिंदी व्हर्जनच्या कमाईवर अवलंबून राहावे लागेल असे वाटत होते. अपेक्षेप्रमाणे हिंदी प्रेक्षकांनीही चित्रपटाला पसंती दर्शवली असून, 3.35 कोटींच्या भरघोस मदतीमुळे चित्रपटाने 10 कोटींचा आकडा पार केला आहे.

Advertisement

मल्टीप्लेक्स असो वा सिंगल स्क्रीन, संपूर्ण महाराष्ट्रात 'राजा शिवाजी'चा जयघोष पाहायला मिळत आहे. रितेश देशमुखचे दिग्दर्शन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील त्याचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.  शनिवार आणि रविवारी कमाईचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.