जाहिरात

जब्या-शालूचे खरंच लग्न झालंय? सोमनाथने लग्नानंतरच्या पारंपरिक विधीचा VIDEO केला शेअर

Somnath Awaghade And Rajeshwari Kharat : अभिनेता सोमनाथ अवघडेने राजेश्वरी खरातसोबतचा आणखी एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या लग्नाबाबतची चर्चा सुरू झालीय.

जब्या-शालूचे खरंच लग्न झालंय? सोमनाथने लग्नानंतरच्या पारंपरिक विधीचा VIDEO केला शेअर

Somnath Awaghade And Rajeshwari Kharat : 'फँड्री' सिनेमा फेम अभिनेता सोमनाथ अवघडे आणि अभिनेत्री राजेश्वरी खरात काही महिन्यांपासून चर्चेत आहे. हळद, लग्न समारंभाचे फोटो शेअर केल्यानंतर सोमनाथ अवघडने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर लग्नाशी संबंधित असलेल्या एका विधीचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामुळे जब्या आणि शालूचे खरंच लग्न झाले आहे का? असा प्रश्न पुन्हा एकदा चाहत्यांना पडलाय. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सोमनाथने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सोमनाथ आणि राजेश्वरी लग्नानंतरच्या पारंपरिक विधी करताना दिसत आहेत. चाहत्यांनी अनेक प्रश्न विचार व्हिडीओवर कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडला आहे. 

(नक्की वाचा: शालू-जब्या लग्नबंधनात अडकले? राजेश्वरी खरातने PHOTO केला शेअर)

अनिकेत निकंबे नावाच्या युजरने म्हटलंय की, भाई एकदाचं खरं सांगा मुव्ही शॉट्स आहे की खरंच लग्न झालंय तुमचं?

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Somnath Awaghade Instagram

देवा यांचं खरंच लग्न होऊ दे, अशीही कमेंट एका युजरने केलीय. जब्याला काळी चिमणी गावली एकदाची, असेही एका युजरने म्हटलंय. 

(नक्की वाचा: जब्या-शालूचं जमलं? सोमनाथ अवघडे आणि राजेश्वरी खरातच्या हळदीचा PHOTO VIRAL)

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Somnath Awaghade Instagram

फायनली जी हवी होती, तिच नशीबात होती, असे म्हणत एका युजरने हार्टचे इमोजी शेअर केले आहे.  

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Somnath Awaghade Instagram

सोमनाथ आणि राजेश्वरीचा हळदी समारंभ 

यापूर्वी 31 ऑक्टोबरला सोमनाथ आणि राजेश्वरीने सोशल मीडियावर त्यांच्या हळदीचा फोटो शेअर केला होता. हळदीचा फोटो पाहून हे दोघं खरंच लग्न करत आहेत की हे एखाद्या शुटिंग सीनचा भाग आहे? असा प्रश्न त्यावेळेसही चाहत्यांना पडला होता. हळदी समारंभासाठी सोमनाथने पांढऱ्या रंगाचा कुर्ता-पायजमा परिधान केला होता तर राजेश्वरीने पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. 
 

जब्या-शालूचा लग्नमंडपातील  फोटो 

हळदीच्या समारंभानंतर 2 नोव्हेंबरला राजेश्वरी खरातने लग्नमंडपातील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. फोटोमध्ये राजेश्वरी-सोमनाथ नववधू आणि वराच्या वेशामध्ये दिसत होते. लग्नसोहळ्यासाठी सोमनाथने सोनेरी रंगाचा कुर्ता पायजमा घातला होता तर राजेश्वरीने मोरपंखी रंगाची साडी नेसली होती. हळदीच्या फोटोनंतर सोमनाथने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये दोघांचा रोमँटिक पोझमधीलही फोटो शेअर केला होता.

दरम्यान सोमनाथने शेअर केलेल्या व्हिडीओमुळे पुन्हा एकदा या दोघांचे खरंच लग्न झालंय की हे सारं काही एका चित्रपटाचा भाग आहे? हे जाणून घेण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.