Rajpal Yadav : राजपाल यादवचे पूर्ण नाव काय? एकूण संपत्ती किती, लग्न किती केली? वाचा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर

Rajpal Yadav Case: राजपाल यादवशी संबंधित कित्येक प्रश्न चाहत्यांच्या मनात उपस्थित झाले आहेत. लोक त्याच्याबाबतची माहिती मोठ्या प्रमाणात शोधत आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Rajpal Yadav Case: अभिनेते राजपाल यादव अडचणीत"
Social Media

Rajpal Yadav Case: राजपाल यादव हा हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध विनोदी अभिनेता आहे. त्याने आपल्या वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांना खूप हसवले आहे. पण सध्या तो एका चेक बाऊन्स प्रकरणामुळे चर्चेत आहेत. सर्वत्र याच प्रकरणाची चर्चा सुरू आहे. दरम्यान राजपाल यादवने आपल्या करिअर सुरुवात कधी केली होती, त्याचे अभिनयाचे स्वप्न कसं पूर्ण झाले होते. यासह त्याच्या अन्य गोष्टींबाबत माहिती जाणून घेण्यासाठी लोक आतुर आहेत. जाणून घेऊया सविस्तर माहिती... 

राजपाल यादवशी संबंधित माहिती |  Bollywood Actor Rajpal Yadav FAQs

1. राजपाल यादवचा जन्म कुठे झाला होता?
राजपाल यादवचा जन्म 16 मार्च 1971 रोजी उत्तर प्रदेशातील कुंद्रा येथे झाला.

2. राजपाल यादवचे वय किती आहे?
राजपाल यादवचे वय 54 वर्षे आहे.

3. राजपाल यादवचे पूर्ण नाव काय आहे?
राजपाल यादवचे पूर्ण नाव राजपाल नौरंग यादव आहे.

4. राजपाल यादवचा पहिला चित्रपट कधी प्रदर्शित झाला?
राजपाल यादवचा पहिला चित्रपट 1999 साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे नाव 'दिल क्या करे' असे होते. या चित्रपटात त्यांनी शाळेतील सुरक्षा रक्षकाची भूमिका साकारली होती.

5. राजपाल यादवला लोकप्रियता आणि ओळख कधी मिळाली?
रामगोपाल वर्मा दिग्दर्शित 'जंगल' या सिनेमामुळे राजपाल यादवच्या करिअरला कलाटणी मिळाली. त्याने या चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारली होती, पण त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले.

(नक्की वाचा: Bollywood News: ना शाहरूख, ना सलमान, ना अमिताभ!, राजपाल यादवच्या मदतीला उभा राहिला 'हा' रिअल हीरो)

6. राजपाल यादवची पहिली पत्नी कोण होती?
राजपाल यादवची पहिली पत्नी करुणा यादव होत्या. त्यांचा विवाह 1992 मध्ये झाला होता. पहिल्या अपत्याच्या जन्मावेळी काही गुंतागुंत परिस्थिती निर्माण झाल्याने त्यांचे निधन झाले.

Advertisement

7. राजपाल यादवची दुसरी पत्नी कोण आहे?
राजपाल यादवची दुसरी पत्नी राधा यादव आहेत. त्याने राधाशी 2003 साली विवाह केला.

8. राजपाल यादवला किती अपत्य आहेत?
राजपाल यादवला तीन मुली आहेत.

9. राजपाल यादवची संपत्ती किती आहे?
राजपाल यादवची एकूण संपत्ती सुमारे 85 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.