Rakhi Sawant Marriage cancel : बॉलिवूडची 'ड्रामा क्वीन' राखी सावंतच (Rakhi Sawant) चं नियोजित लग्न मोडलं आहे. राखीनं काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानी कलाकार आणि उद्योगपती डोडी खानशी (Dodi Khan) शी लग्न करणार असल्याचं जाहीर केलं होतं. विशेष म्हणजे डोडीनंच राखीला लग्नाची मागणी घातली होती.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राखीनं डोडीचा प्रस्ताव स्विकारत आपण पाकिस्तानची सून होणार असल्याची घोषणा केली. आपण लग्न पाकिस्तानमध्ये करणार. त्या लग्नाचं भारतामध्ये मोठ्या धूमधडाक्यात रिस्पेशन होणार असं राखीनं जाहीर केलं होतं. त्याचबरोबर लग्नानंतर हानीमूनसाठी स्वित्झर्लंड किंवा नेदरलँडला जाणार असल्याचं गुपीतही तिनं सांगितलं. पण, या घोषणेनंतर काही दिवसांमध्येच हे लग्न मोडलं आहे. राखीचा नियोजीत वर डोडी खाननं तिच्याबरोबर लग्न करण्यास नकार दिला आहे.
डोडी खाननं त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट केलाय. त्यामध्ये त्यानं राखीशी लग्न करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. राखीनं या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. मोडलेल्या ऱ्हदयाची इमोजी राखीनं तिच्या प्रतिक्रियेत पोस्ट केलीय. त्यामुळे दोघांचं लग्न मोडलं असल्याचं स्पष्ट झालं आहे.
( नक्की वाचा : राखी सावंत लग्न करणार होती तो पाकिस्तानी कलाकार डोडी खान कोण आहे? )
काय म्हणाला डोडी?
डोडी खान म्हणाला, 'नमस्ते भारत आणि पाकिस्तान. मी डोडी खान आहे. काही दिवसांपूर्वी तुम्ही माझा राखी सावंतला प्रपोच करणारा व्हिडिओ पाहिला होता. मी तिला प्रपोज केलं होतं कारण मी तिला खूप चांगल्या पद्धतीनं ओळखतो.
राखीनं तिच्या आयुष्यात खूप चढ-उतार पाहिले आहेत. तिने तिच्या आई-वडिलांचा वियोग सहन केला. ते आजारी असताना राखी त्यांच्यासोबत होती. तिच्या आयुष्यात एक मुलगा आला, त्यानं तिच्याबरोबर काय केलं हे सर्वांनाच माहिती आहे. ती अनेक मोठ्या दु:खातून बाहेर आली आहे. तिने इस्लाम कबूल केला. उमराह करण्यासाठी गेली. स्वत:चं नाव बदलून फातिमा ठेवलं. हे सर्व मला खूप आवडलं. त्यामुळे मी तिला प्रपोज केले.'
कुणाशी लावणार राखीचं लग्न?
डोडी खान इथंच थांबला नाही. त्यानं राखीचं लग्न कुणाशी लावून देणार हे देखील सांगितलं. तो पुढे म्हणाला, 'लोकांनी ही स्वीकारलं आहे, असं मला वाटत नाही. कारण, मला खूप मेसेज आणि व्हिडिओ आले आहेत. ते मी सहन करु शकत नाही. राखीजी तुम्ही माझ्या खूप चांगल्या मैत्रिण आहात. नेहमी राहणार. तुम्ही माझी पत्नी होऊ शकत नाहीत. पण, मी वचन देतो तुम्ही पाकिस्तानच्या सून होणार. मी माझ्या एखाद्या भावाशी तुमचं लग्न लावून देईल.'
राखीचे झाले होते दोन लग्न
राखी सावंतचे यापूर्वी दोन लग्न झाले होते. राखीनं पहिलं लग्न रितेश राज सिंहसोबत केलं होतं. ते दोघं बिग बॉस 15 मध्ये सहभागी झाले होते. या कार्यक्रमानंतर ते वेगळे झाले. त्यानंतर राखीनं आदिल खान दुर्रानीसोबत दुसरं लग्न केलं. या दोघांनी 2023 मध्ये घटस्फोट घेतला होता.