'धुरंधर' सोशल मीडियावर अचानक गाजायला का लागला ? ट्रेंडमध्ये आलाय Ranveer Singh चा चित्रपट, पाहा VIDEO

Ranveer Singh’s Dhurandhar 2 Teaser Out: रणवीर पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर कहर करण्यासाठी सज्ज झाला असून धुरंधर 2 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Dhurandhar 2 Teaser Out: रणवीर सिंहच्या धुरंधर - 2 या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आहे.
मुंबई:

Ranveer Singh's Dhurandhar 2 Teaser Out: सोशल मीडियावर सध्या फक्त एकाच चित्रपटाची चर्चा आहे आणि तो चित्रपच म्हणजे धुरंधर. अभिनेता रणवीर सिंहच्या चित्रपटाचा दुसरा भाग येणार असल्याची घोषणा यापूर्वीच करण्यात आली होती. त्यानंतर आज (मंगळवार 3 फेब्रुवारी)  धुरंधर - 2 या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे धुरंधर पुन्हा एकदा ट्रेंडमध्ये आला आहे. 

आदित्य धरच्या दिग्दर्शनाखाली बनलेला धुरंधर हा 2025 मधील सर्वात मोठा हिट चित्रपट ठरला होता. आता या यशानंतर रणवीर पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर कहर करण्यासाठी सज्ज झाला असून धुरंधर 2 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची क्रेझ सोशल मीडियावर इतकी वाढली आहे की चाहत्यांमध्ये आतापासूनच त्याची जबरदस्त चर्चा सुरू झाली आहे.

रणवीर सिंहचा डेडली लूक आणि पोस्टरची चर्चा

धुरंधर 2 बद्दल उत्सुकता वाढवण्यासाठी मेकर्सनी टीझरच्या आधी रणवीर सिंगचा एक नवीन पोस्टर शेअर केला आहे. या पोस्टरमध्ये रणवीर अत्यंत रागीट आणि भयानक लूकमध्ये दिसत असून रेड आणि ब्लॅक थीममुळे चित्रपटाचे गांभीर्य स्पष्टपणे जाणवत आहे. या पोस्टरमध्ये रणवीरच्या मागे द रिवेंज म्हणजेच बदला असं लिहिलं आहे. पहिल्या भागाच्या यशानंतर आता हा बदला नक्की कोणाविरुद्ध असणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. या पोस्टरने सोशल मीडियावर रणवीरच्या चाहत्यांना वेड लावलं असून प्रत्येक जण हा पोस्टर शेअर करत आहे.

( नक्की वाचा : दक्षिणेकडचा मेगास्टार, राज घराण्यातली अभिनेत्री: रहमान यांचं संगीत असलेलं हे मराठी गाणं पाहिलं का? VIDEO )
 

टीझरमध्ये दिसली सूडाची धगधगती आग

धुरंधर 2 च्या टीझरमध्ये रणवीर सिंह म्हणजेच जसकीरत सिंह रंगीचं हमजामध्ये होणारं रुपांतर दाखवण्यात आलं आहे. हे रुपांतर पाहून प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आपल्या देशाचं रक्षण करण्यासाठी आणि जुना बदला घेण्यासाठी त्याला सर्वात धोकादायक गँगमध्ये घुसावं लागतं, असं टीझरमधून सूचित होत आहे. स्वतःचं सर्वस्व पणाला लावून तो हा लढा कसा देणार, हीच या चित्रपटाची मुख्य कथा असणार आहे. हा भावनिक आणि अ‍ॅक्शनने भरलेला प्रवास प्रेक्षकांना थक्क करणारा ठरेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

Advertisement

बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा येणार वादळ

आदित्य धरचा धुरंधर हा 2025 मधील सर्वात गाजलेला चित्रपट ठरला होता. आता धुरंधर: द रिवेंज या नावाने येणारा हा दुसरा भाग अधिक मोठा आणि भव्य असणार आहे. हा चित्रपट 19 मार्च 2026 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे याच काळात गुढीपाडवा आणि ईद असे मोठे सण असल्याने चित्रपटाला सुट्ट्यांचा मोठा फायदा मिळणार आहे. 

हा चित्रपट केवळ हिंदीतच नाही, तर तेलगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम अशा पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. दक्षिण भारतातही या चित्रपटाची मोठी मागणी असल्याने 2026 हे वर्ष धुरंधरचं असणार असं दिसतंय.

Advertisement

( नक्की वाचा : कोण होता रहमान डकैत? Dhurandhar मध्ये Akshaye Khanna ने साकारलीय भूमिका, स्वत:च्या आईचीच केली होती हत्या )

मोठ्या बॅनरखाली तयार झालेला स्पाई थ्रिलर

धुरंधर: द रिवेंज हा एक हाय-ऑक्टेन स्पाई-अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. याचं लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती स्वतः आदित्य धरने केली असून ज्योती देशपांडे आणि लोकेश धर यांनीही निर्मितीमध्ये मोलाची भूमिका बजावली आहे. जिओ स्टुडिओज आणि B62 स्टुडिओजच्या बॅनरखाली तयार झालेला हा चित्रपट 19 मार्च 2026 पासून मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घालण्यासाठी तयार आहे. रणवीरचा अ‍ॅक्शन अवतार पुन्हा एकदा पाहण्यासाठी त्याच्या फॅन्सनी टिझरनंतर काऊंटडाऊन सुरु केलं आहे. 

इथे पाहा धुरंधर 2 चा टिझर

Topics mentioned in this article