Rashmika Mandanna- Vijay Deverakonda Engagement: दाक्षिणात्य सिनेसृष्टीची सौंदर्यवती रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा यांच्या प्रेमप्रकरणाची नेहमीच चर्चा पाहायला मिळते. रश्मिका आणि विजय देवरकोंडा एकमेकांना डेट करत असून लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचे बोलले जात होते. याचबाबत आता एक मोठी घडामोड समोर आली असून रश्मिका आणि विजय देवरकोंडा यांनी साखरपुडा उरकल्याचे सांगण्यात येत आहे.
'पुष्पा २' (Pushpa 2) आणि आगामी 'सिकंदर' (Sikandar) यांसारख्या मोठ्या चित्रपटांमुळे बॉलिवूडमध्ये (Bollywood) आपली ओळख निर्माण करणारी दाक्षिणात्यअभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) हिने गुपचूप साखरपुडा (Engagement) केल्याची चर्चा सध्या सिनेसृष्टीत रंगली आहे. कथित माहितीनुसार, रश्मिकाने साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) याच्याशी कुटुंबातील सदस्य आणि काही निवडक खास मित्रांच्या उपस्थितीत साखरपुडा उरकला आहे.
खासगी समारंभात साखरपुडा, फेब्रुवारीत लग्न:
रश्मिका आणि विजय देवरकोंडा यांच्या साखरपुड्याच्या बातम्यांनी सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच धुमाकूळ घातला आहे. रिपोर्टनुसार, या दोघांनी ही 'गुड न्यूज' (Good News) अद्याप अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. मात्र माध्यमांमधील वृत्तांनुसार हे दोघेही २०२६ च्या सुरुवातीला फेब्रुवारी महिन्यात लग्नगाठ बांधणार असल्याचे बोलले जात आहे.
काही दिवसांपूर्वीच रश्मिकाने साडी परिधान करून पारंपरिक (Traditional) लूकमध्ये कपाळावर टिळा लावलेला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या पोस्टमध्ये तिने चाहत्यांना दसऱ्याच्या (Dussehra) शुभेच्छा दिल्या होत्या. काही चाहत्यांनी अंदाज लावला की हे फोटो तिच्या साखरपुड्याच्या पोशाखातील (Engagement Outfit) असावेत.
या पोस्टमध्ये रश्मिकाने तिच्या चाहत्यांचे आभार मानले होते. तिने लिहिले होते, "दसरा मुबारक हो माझ्या प्रियजनांनो. 'थामा'च्या ट्रेलरवर आणि आमच्या गाण्यावर तुम्ही जो प्रेमाचा वर्षाव केला आहे, त्यासाठी मी खूप आभारी आहे. तुमचे संदेश, तुमचा उत्साह, तुमचा सातत्यपूर्ण पाठिंबा... तुम्ही प्रत्येक क्षण खास आणि आनंदी बनवता. प्रमोशनच्या दरम्यान तुमच्या सगळ्यांना लवकरच भेटण्यासाठी मी उत्सुक आहे."
रश्मिका किंवा विजय देवरकोंडा यांनी त्यांच्या प्रेमसंबंधांना (Relationship) किंवा साखरपुड्याच्या बातमीला अद्याप अधिकृत दुजोरा (Official Confirmation) दिलेला नाही. मात्र, याआधीही सोशल मीडियावर त्यांच्या व्हेकेशनचे (Vacation) फोटो व्हायरल झाले होते आणि त्यांच्या जोडीला चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले आहे. आता साखरपुडा आणि लग्नाच्या बातमीनंतर चाहते या कपलला शुभेच्छा देत आहेत.
रश्मिकाच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, तिची आगामी फिल्म 'थामा' (Thaama) ही हॉरर-कॉमेडी (Horror-Comedy) असून, ती २१ ऑक्टोबर २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केले असून, यात रश्मिकासोबत आयुष्मान खुराना, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि परेश रावल यांसारखे मोठे कलाकार दिसणार आहेत.