जाहिरात

Prajakta Gaikwad Wedding: प्राजक्ता गायकवाडचं या तारखेला या शुभ मुहूर्तावर पार पडणार लग्न, पत्रिका पाहिली का?

Prajakta Gaikwad Wedding : मराठी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडच्या लग्नाची तारीख आली समोर...

Prajakta Gaikwad Wedding: प्राजक्ता गायकवाडचं या तारखेला या शुभ मुहूर्तावर पार पडणार लग्न, पत्रिका पाहिली का?
"Prajakta Gaikwad Wedding: प्राजक्ता गायकवाडच्या लग्नाची पत्रिका पाहिला का"
Prajakta Gaikwad Instagram

Prajakta Gaikwad Wedding: ‘स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेद्वारे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. प्राजक्ता गायकवाडने सोशल मीडियावर लग्नपत्रिकेचा व्हिडीओ देखील शेअर केले आहेत. प्राजक्ताच्या साखरपुड्याचे फोटो पाहिल्यानंतर आवडत्या अभिनेत्रीचा लग्नसोहळा कधी आणि कुठे होणार? हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक होते. अखेर प्राजक्ताच्या लग्नाची तारीख समोर आलीय.

प्राजक्ता गायकवाड आणि शंभुराज खुटवडचे लग्न कधी होणार?

प्राजक्ता गायकवाडने सोशल मीडियावर लग्नपत्रिका पूजनाची खास पोस्ट शेअर केलीय. व्हिडीओमध्ये तिच्या लग्नाची पत्रिका दिसतेय. पत्रिकेवरील माहितीनुसार प्राजक्ताचे लग्नाचे 2 डिसेंबर 2025 (मंगळवारी) रोजी होणार आहे. लग्नाच्या पत्रिकेचे डिझाइन पारंपरिक पद्धतीचे आहे.  

प्राजक्ता गायकवाडच्या लग्नाचा शुभ मुहूर्त 

प्राजक्ता गायकवाड आणि शंभुराज खुटवडचे लग्न 2 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजून 24 मिनिटे या शुभ मुहूर्तावर पार पडणार आहे. 

(नक्की वाचा: Prajakta Gaikwad Engagement Photos: स्वराज्यरक्षक संभाजी फेम प्राजक्ता गायकवाडच्या होणाऱ्या अहोंचा फोटो पाहिला का?)

प्राजक्ता गायकवाड आणि शंभुराज खुटवडची लव्हस्टोरी

प्राजक्ता गायकवाडने ‘राजश्री मराठी' यु-ट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला होता. सिनेमाचे शुटिंग संपवून घरी जात असताना तिच्या गाडीला ट्रकची धडक बसली. या अपघातामुळे ती घाबरली आणि गाडीतून बाहेर येऊन तिने ट्रक चालकाशी वाद घालून त्याच्या मालकाला बोलावण्यास सांगितले. चालक विचित्र बोलू लागला. पण त्यावेळेस शंभुराजने सर्व परिस्थिती व्यवस्थित हाताळली. यानंतर दोघांच्या भेटीगाठी वाढल्या. प्राजक्ता शंभुराजला दादा म्हणून हाक मारायची पण त्याने तिला कधीही ताई म्हटलं नाही. तो तिला कायम मॅडम म्हणून हाक मारायचा. यानंतर मैत्री आणि मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. आता लवकरच दोघंही लग्नबंधनात अडकणार आहेत.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com