Rashmika Mandanna on men's menstruation : जगपती बाबू यांच्या 'जयम्मू निश्चयमु रा'मध्ये रश्मिका मंदानाने केलेल्या वक्तव्यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. पुरुषांना एकदा तरी मासिक पाळी यावी, यातूनच त्यांना महिलांना दर महिन्याला होणाऱ्या त्रासाची जाणीव होईल. रश्मिकाच्या या वक्तव्यानंतर नेटिझन्सच्या एक ग्रुपने त्यांना पुरुषांप्रती असंवेदनशील असल्याचं म्हटलं आहे. रश्मिकाने सोशल मीडियावर सुरू असलेल्या वादावर आपली भूमिका मांडली आहे.
रश्मिकाने मासिक पाळीच्या वक्तव्यावर दिली प्रतिक्रिया
एका फॅन पेजने रश्मिकाची त्या वक्तव्याची क्लिप शेअर केली, ज्यामध्ये रश्मिकाने आपलं मत मांडलं आहे. ट्विटमध्ये तिने लिहिलंय, पुरुषांच्या मासिक पाळीवर रश्मिकाचं मत - कधी कधी आपल्याला इतकच वाटतं की, आपल्या वेदना आणि भावना समोरच्याने समजून घ्याव्यात. ही तुलना नाही किंवा पुरुषांच्या जबाबदाऱ्या कमी करण्याबाबत नाही. मात्र अहंकारातून अशा प्रकारचा विचार केला जात आहे. रश्मिका मंदानाने आपल्या वक्तव्याचं स्पष्टीकरण देत सांगितलं की, आता याबद्दल कोणी काहीच बोलणार नाही. त्यामुळे एखादा शो किंवा मुलाखतीत जायला मला भीती वाटते. कारण मी काहीतरी वेगळं म्हणते आणि त्याचा मतितार्थ काहीतरी वेगळाच काढला जातो.
नक्की वाचा - Girija Oak Viral : मराठमोळी गिरीजा ओक ठरलीये नॅशनल क्रश, हॉलिवूडच्या अभिनेत्रींशी होतेय तुलना, कारण काय?
रश्मिका काय म्हणाली?
जगपति बाबू याच्या शोमध्ये रश्मिका म्हणाली, हा, माझी इच्छा आहे की, पुरुषांना कमीत कमी एकदा तरी मासिक पाळी यावी. यामुळे ते महिलांना होणारा त्रास आणि वेदना समजून घेऊ शकतील. यादरम्यान हार्मोन्सचं होणार असंतुलन, आम्ही असं काहीतरी अनुभवत असतो जे कदाचित आम्हालाही कळत नाही. यासर्वांचं प्रेशर पुरुषांवर देऊ शकत नाही. कारण तुम्ही महिलांना कितीही समजून घेत असला तरी तो अनुभव घेऊ शकत नाही. त्यामुळे पुरुषांना एकदा जरी मासिक पाळी आली तर त्यांना या काळातील वेदना किती असतात हे लक्षात येईल.
ती पुढे म्हणाली, मला मासिक पाळीत खूप जास्त त्रास होतो. एकदा तर यादरम्यान मी बेशुद्ध झाली होती. यासाठी मी अनेक तपासण्या करून घेतल्या, डॉक्टरांचा सल्ला घेतला. मात्र कोणाच्याही यामागील कारण लक्षात येत नव्हतं. दर महिन्याला मी देवाला हेच म्हणायचे, हे देवा मला इतका त्रास का देत आहेत? मला असं वाटतं ही भावना किंवा वेदना समजून घेण्यासाठी त्याचा अनुभव घेणं आवश्यक आहे. त्यामुळे पुरुषांना किमान एकदा तरी मासिक पाळी यावी. रश्मिकाचा नुकताच एक चित्रपट रिलीज झाला आहे. द गर्लफ्रेंडचं कौतुक केलं जात आहे.