- रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाच्या तारखेवर वेगवेगळ्या चर्चा
- काही रिपोर्ट्सनुसार दोघे २ फेब्रुवारी किंवा २६ फेब्रुवारी रोजी लग्न करणार असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत
- रश्मिका मंदानाच्या लग्नाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे
प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा याचं लग्न ठरलं आहे. पण त्यांच्या लग्नाच्या तारखेवरून संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा होताना दिसत आहेत. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाच्या बातम्यांनी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. एका व्हायरल व्हिडिओनुसार, हे दोघे 2 फेब्रुवारी रोजी उदयपूरच्या सिटी पॅलेसमध्ये विवाहबंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात होते. तर काही रिपोर्ट्सनुसार लग्नाची तारीख 26 फेब्रुवारी सांगण्यात येत आहे. अद्याप दोन्ही कलाकारांच्या टीमकडून अधिकृत दुजोरा मात्र मिळालेला नाही. त्यामुळे संभ्रम वाढत आहे.
रश्मिका मंदानाने कन्नड चित्रपट 'किरिक पार्टी'मधून पदार्पण केले आहे. तीचा टॉलिवूडमध्ये ही दबदबा आहे. असे असले तरी आज ती बॉलिवूडमध्येही स्थिरावली आहे. तिने बॉलिवूडमध्ये ही एका मागोमाग एक हिट चित्रपट दिले आहेत. 'फोर्ब्स'च्या मते रश्मिकाची एकूण संपत्ती 66 कोटी रुपये आहे. ती एका चित्रपटासाठी 4 ते 8 कोटी रुपये मानधन घेते. दुसरीकडे, विजय देवरकोंडाची संपत्ती 50 ते 70 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. विजयकडे बीएमडब्ल्यू आणि रेंज रोव्हरसारख्या महागड्या गाड्यांचा ताफा आहे.
रश्मिकाचा जन्म 5 एप्रिल 1996 चा असून विजयचा जन्म 9 मे 1989 चा आहे. यानुसार दोघांच्या वयात 7 वर्षांचे अंतर आहे. चाहत्यांना आता केवळ त्यांच्या लग्नाच्या अधिकृत फोटोंची प्रतीक्षा आहे. 'नॅशनल क्रश' रश्मिकाची लोकप्रियता अफाट आहे. तिची नेटवर्थ जवळपास 66 कोटी रुपये असून ती जागतिक स्तरावरील ज्वेलरी ब्रँडची ब्रँड अँबेसेडर देखील आहे. विजय देवरकोंडा देखील मागे नाही. त्याची नेटवर्थ 50 ते 70 कोटींच्या घरात आहे. अभिनयासोबतच दोघेही ब्रँड एंडोर्समेंटमधून मोठी कमाई करतात. आता ते कधी लग्न बंधनात अडकतात याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.